दिलासादायक! 10 ऑगस्ट पर्यंत कोरोनाची लस येणार?

मुंबई | सध्या जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आजही लाखो लोक या विषाणूशी झुंज देत आहेत. अनेक देश या महामारीवर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच कोरोना लसीसंबंधीत आता दिलासादायक माहिती समोर आली आहे.

रशियातील मॉस्कोच्या गमालय इन्स्टिट्यूटमध्ये विकसित करण्यात आलेली लस लवकरच आपल्यासाठी उपलब्ध होऊ शकते. सीएनएन वहिनीला दिलेल्या माहितीनुसार रशियन शास्त्रज्ञ 10 ऑगस्ट किंवा त्यापूर्वी लस मंजूर करण्याचा प्रयत्न करत आहे.

रशियन लसीचे परिक्षण निकाल न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात येत आहेत. सुरुवातीला ही लस आठ माकडांना देण्यात आली होती. लस दिल्यानंतर माकडांमध्ये सार्स-कोव-2 वर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अँटिबॉडीज तयार झाल्या होत्या.

या लसी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती रशियाकडून देण्यात आलेली नाही. मात्र, राजकीय दबावामुळे ही लस लवकरच उपलब्ध होऊ शकते असा काही लोकांचा विश्वास आहे. दरम्यान, रशियावर कोरोना लसीशी संबंधित माहिती चोरल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, रशियाने तो आरोप फेटाळून लावला होता.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ भाजप आमदाराच्या भावाच्या मॅरेज हॉलवर चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश

चांगली बातमी! पुण्यात आज दिवसभरात 2 हजारांहून अधिक रूग्णांची कोरोनापासून सुटका

कौतुकास्पद! पुण्यात हॉटेलमध्ये काम करून रात्रशाळेत शिक्षण घेत ‘तीनं’ मॅट्रीकमध्ये मिळवलं यश!

लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवला, देशात काय सुरू आणि काय बंद?; वाचा एका क्लिकवर

रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर अंकिता लोखंडे म्हणाली…