नवी दिल्ली | सोशल मीडियावर सातत्यानं काहीतरी व्हायरल होत असतं. कधी चांगलं तर कधी वाईट असं दोन्ही बाजूंनी व्हायरल होण्याचं प्रमाण आता वाढलं आहे. अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तंत्रज्ञानाची क्रांती झाल्यापासून प्रत्येक गोष्ट लवकर उरकण्याची एक सवय सर्वांना लागत आहे. अशात प्रत्येकजण अधिक निष्काळजी होत असल्याचंही पहायला मिळत आहे. परिणामी धोकाही वाढत आहे.
सध्या कर्नाटकमधील बेल्लारी रेल्वे स्थानकातील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. गर्दी असल्यावर गर्दीच्या ढकलल्या जाण्यानं अथवा रेल्वे पकडण्याच्या नादात रेल्वे ट्रॅकवर पडण्याची अनेक प्रकरणं आहेत. पण गर्दी नसताना निष्काळजीपणा महिलेच्या जीवावर बेतू शकला असता.
रेल्वे स्थानकावरील एक धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सकाळी 4.30 च्या सुमाराचा आहे. जिथे महिला घाई करण्याच्या नादात रेल्वेत चढत असताना पडते. पण वेळीच तेथे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यानं त्या महिलेचे प्राण वाचवले.
सीसीटीव्ही व्हिडीओ कर्नाटकमधील रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचा आहे. स्थानकावर आलेल्या हरिप्रिया एक्सप्रेसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असलेली महिला तोल जाऊन कोसळते. कसलाही विलंब न करता पोलीस कर्मचारी महिलेला बाहेर खेचतो.
अशात परिस्थितीत त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या जवानानं लागलीच मदत करण्यासाठी धाव घेतली. त्यानंतर तेथील काही प्रवासी देखील जवानाच्या मदतीला धावले.
महिलांचं रेल्वे रूळावर पडण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. अशा परिस्थिती हा व्हिडीओ व्हायरल होत असल्यानं सर्वांना काळजी घेण्याची गरज भासत आहे.
दरम्यान, प्रवाशाचे प्राण वाचवल्यामुळं जवानाचं सर्व स्तरातून कौतूक करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी ड्यूटी असेल त्या ठिकाणी नागरिकांच्या जिवाचं रक्षण करणं हे काम जवान निष्ठेनं करतात याचं हे उदाहरण आहे.
पाहा व्हिडीओ –
Another psgr in a hurry saved by Govt Rly Police. Lady rescued @ Bellary stn @ 4.30am 2day by cop Maruti when she slipped when brd Haripriya Exp 2 her hometown Gadag @XpressBengaluru @NewIndianXpress @KARailway @KannadaPrabha @AshwiniVaishnaw @deepolice12 @DgpKarnataka @GowriIps pic.twitter.com/skvWBDqdAE
— S. Lalitha (@Lolita_TNIE) March 1, 2022
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या प्रयत्नांना यश! युद्धजन्य परिस्थितीत रशिया भारताला मदत करणार
“सापाच्या पिलाला आम्ही 30 वर्षे दूध पाजले, ते पिल्लू आता आमच्यावरच फुत्कारतंय”
आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक सज्ज
“सरकार पडणार, सरकार पडणार, माझे 170 मोहरे फोडून दाखवाच”
आनंदाची बातमी! महाराष्ट्रात आज कोरोनानं एकाचाही मृत्यू नाही