लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी शिकवली अद्दल, पाहा व्हायरल व्हिडीओ

अंबाला |  गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातलं आहे. मागील काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतं आहे.

यासाठी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नाहीय. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.

सगळीकडे आता कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत खूप जास्त प्रमाणात वाढ होत आहे. यासाठी सरकारने घालून दिलेल्या निर्बंधांचे कडक पालन न झाल्यास पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

तसेच हरियाणामध्ये  10 मेपर्यंत लॉकडाऊन केलं गेलं आहे. त्यामुळे विनाकारण घराच्या बाहेर पडणाऱ्यांवर पोलिस चांगलीच कारवाई करत आहेत. अशातच हरियाणातील अंबोलामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये लॉकडाऊन असूनही विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली असल्याचं पाहायला मिळतं आहे. व्हिडीओमध्ये असं पाहायाला मिळतं आहे की, पोलीस कारण नसताना घाराबाहेर पडणाऱ्यांकडून लोक उठाबशा काढून घेत आहेत.

सगळेजण एका रांगेत उभं करून त्यांच्यासमोर काठी घेऊन उभं राहून ते व्यवस्थित उठाबशा काढत आहेत की नाही, हेही पोलीस तपासत आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ ‘@ANI’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. शेअर करताना ‘WATCH Police in Ambala punished people who were found violating the complete COVID19 lockdown imposed in the state & made them do sit-ups on the roads today morning. Police say, the violators were let off with warning’ असं कॅप्शनही दिलं आहे.

तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ 7 हजार लोकांनी पाहिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कार चोरण्यासाठी आलेल्या चोरांना पळवून लावण्यासाठी तरूणाने…

कोरोना लस घ्यायला आलेल्या तरूणीला डॉक्टर म्हणाले ‘दफा…

दिलासादायक! महाराष्ट्रातील ‘हे’ गाव झालं…

शेतातील नांगरणीवरून दोन भावांमध्ये वाद; कोरोनाबाधित रूग्णानं…

‘हा’ व्हिडीओ बघून तुमच्याही अंगाचा होईल थरकाप, त्यामुळे…