बिहारच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याच राजकीय षडयंत्र- जितेंद्र आव्हाड

मुंबई | सुशांत सिहं राजपूतच्या आत्महत्येच्या तपासावरून सध्या राजकीय वतावरण चांगलच तापलं आहे. बिहार पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येचा तपास आमच्याकडे द्यावा, अशी मागणी केली आहे, परंतू महाराष्ट्र पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. यावरून महाराष्ट्र पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक आरोप केला आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे राजकारण करून चौकशी CBI च्या हातात द्यावी असं म्हणणं म्हणजे महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारख आहे. प्रकरणाची महाराष्ट्र पोलिसांनी चौकशी करावी अशी पहिली मागणी मीच केली होती. त्यानंतर महाराष्ट्र पोलीसांनी देखील अत्यंत जलद गतीने पारदर्शक तपास चालवला आहे.

बिहारच्या येणाऱ्या निवडणूका यासाठी महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याच हे राजकीय षडयंत्र रचलं जात असून याचा निषेधच करायला पाहिजे, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि बॉलिवूडमधल्या माफियांच्या दबावाखाली असल्याचा गंभीर आरोप बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदींनी केला होता.

 

महत्वाच्या बातम्या-

‘तो क्षण जेव्हा मी त्याला हो म्हणाले..’; सोनाली कुलकर्णीने चाहत्यांसोबत शेअर केली गोड आठवण

राम मंदिरासाठी मोदींनी नाही तर राजीव गांधींनी योगदान दिलं आहे; भाजपच्या ‘या’ खासदाराचा घरचा आहेर!

‘…म्हणून मी अजूनही कोरोना पॉझिटिव्ह’; अभिषेक बच्चनने सांगितले कारण!

मॉलला परवागनी मग जिमला का नाही?; सलमान खानच्या मराठमोळ्या ट्रेनरचा सरकारला प्रश्न!

… तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल; संजय राऊतांचा इशारा