पूजाच्या वडिलांचा नवा गौप्य.स्फोट, भाजपचं घेतलं नाव!

पूजा चव्हाण आत्म.हत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी भाजपने आ.क्रमक भूमिका घेतली असून वनमंत्री संजय राठोड यांच्यावर का.रवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, पूजा ही तीन वर्ष भाजपची कार्यकर्ती असल्याचा गौप्य.स्फोट तिच्या वडिलांनी केला आहे.

पूजाचे वडिल म्हणाले की, पूजाने तीन वर्ष भाजपसाठी काम केलं आहे. तिथे कोणी काही विचारत नव्हते. काय झालं मला नेमकं माहिती नाही. फक्त बदनामी सुरु आहे. पण साधा मला फोनही केला नाही. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना सर्वांसोबत तिचे फोटो आहेत. पण कोणीही चौ.कशीसाठी फोन केला नाही. सर्वांना सत्य समोर आल्यावर बोलले पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.

कोणी कुणाचं नाव जोडून काहीतरी सांगत आहे. हे सगळं थांबलं पाहिजे. पोलिसांचा तपास सुरु असताना विनाकारण आ.रोप कशाला करत आहात? बदनामी थांबवा असं आव्हान केल्यानंतरही बदनामी सुरु आहे हे थांबलं पाहिजे. पूजा प्रकरणाशी अरुण राठोड नाव जोडंनही चुकीचं असून, त्याचा काही संबध नसल्याचं पूजाच्या वडिलांनी म्हंटलं आहे.

पूजा चव्हाण आत्म.हत्या प्रकरणात ऑ़डिओ कॉल्स समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यामध्ये मंत्र्यासोबत बोलणारा अरुण राठोड होता. त्यामुळे या प्रकरणात तो महत्त्वाचा साक्षीदार मानला जात होता. मात्र न्यूज 18 च्या टीमने त्याचं घर गाठलं असता, घराला कुलुप लागलेलं दिसलं. आपल्या कुटुंबाला घेऊन तो गायब झाल्याचं समोर आलं.

पूजा पुण्यात अरुण आणि त्याच्या एका मित्रासोबत राहात होती अशी माहिती आहे. त्यामुळे पुजासोबत नेमकं काय झालं, संजय राठोड यांचं या प्रकरणात नाव घेतलं जातंय तर त्यांची भूमिका काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अरुणला माहीत असण्याची शक्यता आहे.

अरुण राठोड या प्रकरणातील महत्त्वाचा धागा असल्याने त्याच्यावर दबाव असल्याची माहिती आहे. त्याच्यासह त्याच्या कुटुबियांच्या जीवाला धो.का असल्याचं त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.

महत्वाच्या बातम्या –

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच! ‘या’ महिला आरोपीला दिली जाणार फाशी

IPLच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली!!! दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूवर लागली जबरदस्त बोली

IPL 2021 Auction | पंजाबच्या संघाचं नाव बदललं? के.एल.राहूलचा खुलासा म्हणाला…..

FB चा मोठा दणका; ‘या’ देशात फेसबुकने बातम्या पाहण्यास, शेअर करण्यास घातली बंदी !

अबब…सोन्याच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची घट; वाचा आजचा दर