अनिल परब केंद्राच्या रडावर, लवकरच होऊ शकते ‘ही’ मोठी कारवाई

नवी दिल्ली | महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांविरोधात कारवाईचा सपाटा सुरूच आहे. एकापाठोपाठ एक महाविकास आघाडीमधील अनेक मंत्र्यांवर आतापर्यंत कारवाई झाली आहे.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आता केंद्र सरकारच्या रडारवर आले आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्यावतीने अनिल परब यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

अनिल परब यांना सीआरझेड अंतर्गत येणाऱ्या रिसॉर्टवर कारवाई करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. लवकरात लवकर या  रिसॉर्टचे बांधकाम पाडावे, अशी सूचना या नोटीसीतून देण्यात आली होती.

बांधकाम पाडले नाही तर आपल्यावर कारवाई होईल, असा इशारा देखील या नोटीसीतून देण्यात आला होता. केंद्र सरकारने अनिल परब यांना गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई करण्याचा गंभीर इशारा दिला होता.

सराकरने अनिल परब यांना बांधकाम पाडण्यासाठी दिलेल्या मुदतीचा कालावधी आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे केंद्राकडून येत्या आठवड्यात पुन्हा एकदा नोटीस बजावून अनिल परब यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय पर्यावरण खात्याला यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारच्या वतीने राज्याच्या पर्यावरण खात्याला ही नोटीस देऊन कारवाई करण्याची सूचना देण्यात आली होती.

मात्र, राज्य सरकारच्यावतीने याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली आहे. त्यामुळे आता केंद्राच्या वतीने बांधकाम तोडण्यात येण्याची शक्यता आहे.

केंद्राकडून हे बांधकाम तोडण्याची शक्यता आहेच, शिवाय अनिल परब यांच्याविरोधात गुन्हेगारी कलमांतर्गत कारवाई देखील होऊ शकते, अशी माहिती किरीट सोमय्यांनी दिली आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी अनिल परबांसह मिलिंद नार्वेकर यांच्या सीआरझेड अंतर्गत येणाऱ्या या संपत्तीवरून अनेक खुलासे केले होते. त्यानंतर केंद्राकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला.

महत्वाच्या बातम्या-

दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

मार्केट अपडेट: शेअर मार्केट उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीची उसळी, निफ्टी 17,700 पार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोरोनाच्या विळख्यात, ट्विट करत दिली माहिती

…तर मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल- इकबाल चहल

देशात कोरोनाचा कहर, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, आता…