इलाहाबाद | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल देशवासियांना संबोधित केलं. या भाषणात बोलताना इम्रान खान यांनी भारताचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.
मी भारतातील लोकांना इतरांपेक्षा अधिक जाणतो. मला वाईट वाटतंय की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आणि काश्मीरमधील परिस्थितीच्या कारणामुळे संबंध बिघडले, असं ते म्हणालेत.
भारताबाबत काही बोलण्यास कुणाची हिंमत नाही. कुणा परदेशी ताकदीची हिंमत नाहीय की, भारताच्या परराष्ट्रीय धोरणात हस्तक्षेप करेल. भारत एक स्वाभिमानी देश आहे, असं इम्रान म्हणाले.
इमरान खान यांनी भारताचं कौतुक केल्यानंतर माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्यावर टीका केली आहे.
खुर्ची जात असल्याचं दिसत असल्यानं हा व्यक्ती वेडा झालाय. भारत तुम्हाला जर एवढाच आवडतो तर पाकिस्तान सोडून भारतात जाऊन राहावं, असं मरियम नवाज शरीफ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, इम्रान खान (Imran Khan) यांच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीबाबत आज अंतिम फैसला होणार आहे.
इम्रान खान यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर आज मतदान होईल. सकाळी 11 वाजेपासून पाकिस्तानच्या संसदेच्या कामाला सुरुवात होईल.
इम्रान खान यांना पायउतार करण्यासाठी 342 सदस्यसंख्या असलेल्या सभागृहात विरोधकांना 172 मतांची अवश्यकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई पोलिसांनी ताब्यात घेताच गुणरत्न सदावर्तेंचा अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…
“अजून दगडं मारायला पाहिजे, कारण कर्म या जन्मीच फेडावं लागतं”
“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करावी”
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा, म्हणाले…
Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद, वाचा आकडेवारी