वंचितकडून काँग्रेसला १४४ जागांची ऑफर; मात्र ऑफर फक्त 31 ऑगस्टपर्यंतच!

मुंबई | विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १४४ जागा देण्यासाठी आम्ही तयार आहोत, यासंदर्भात काँग्रेसने 31 ऑगस्टपर्यंत विचार करावा. काँग्रेसकडून कोणतही उत्तर मिळालं नाही, तर आम्ही आमची पुढील भूमिका स्पष्ट करु, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हटलं आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यासाठी काँग्रेसकडे ८० पेक्षा अधिक उमेदवार नाहीत. तरी देखील आम्ही त्यांना १४४ जागा देण्यास तयार आहोत, असं म्हणत त्यांनी काँग्रेसला 31 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. 

प्रकाश आंबेडकर यांनी आज (मंगळवारी) मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात काँग्रेसला मुदत देताना MIM सोबतची आघाडी कायम राहिल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, विरोधकांना संपवण्यासाठी सरकारचा हा डाव आहे, असं म्हणत त्यांनी ईडी चौकशीवरून सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-