“जागे व्हा आणि कामाला लागा अन्यथा वांद्रे सारखा उद्रेक देशभर होईल”

मुंबई |  देशात लॉकडाऊन सुरू असताना देखील काल मुंबईच्या वांद्र्यात बेकायदेशीर 2 ते 3 हजार लोकांचा जमाव जमला होता. हे परप्रांतीय मजूर होते. आम्हाला आमच्या गावाकडे जायचंय, असं ते म्हणत होते. या प्रकरणावचर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे.

जागे व्हा आणि कामाला लागा अन्यथा वांद्रे सारखा उद्रेक देशभर होईल. लॉक डाऊनला विरोध करण्यास आता सुरुवात झाली असून वांद्रे (मुंबई) येथे जमलेली मजुरांची गर्दी हे त्याचे उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनीदिली आहे.

लॉकडाऊन वाढवल्याने हातावर पोट असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी येईल असे त्यांना वाटू लागल्याने, त्यांनी आपला विरोध दर्शविला असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

शासनाकडे अन्नधान्याचा साठा पुरेसा असूनही त्याचे मोफत वाटप झाले नाही म्हणून त्याचा उद्रेक वांद्रे येथे झाला. शासनाने योग्य ते पाऊल उचलले नाही तर त्याचा उद्रेक देशभर होईल, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

-“राज्यावरच्या अर्थसंकटाचे परिणाम दीर्घकाळ जाणवतील”

-पुण्यातल्या रेडिओलॉजिस्टला कोरोना; 144 गर्भवती महिला क्वारन्टाईन

-ट्रेनबाबतची अफवा पसरवणाऱ्याची चौकशी होणार- अनिल देशमुख

-“पंतप्रधानांच्या कॉन्फरन्समध्ये आदित्य ठाकरे मोबाईलवर खेळत बसले नसते तर ही वेळ आलीच नसती”

-राज आणि माझ्यात सारखं बोलणं सुरू आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे