…अन् केंद्र सरकार सोन्याची अंडी देणारी कोंबडी विकायला निघालंय- प्रकाश आंबेडकर

पुणे | केंद्र सरकाची अवस्था दारूड्यासारखी झाली आहे. दारू मिळाली नाही तर दारूडा जसा घरातील वस्तू विकतो त्याप्रमाणे हे सरकार भारतीय पेट्रोलियम कंपनी विकायला निघाले आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्याविरोधात प्रकाश आंबेडकरांनी 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र बंद करून झोपलेल्या सरकारला जागं करू. हा बंद शांततेनं करणार आहोत, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याऐवजी लोकांनी हक्काच्या वंचित बहुजन विकास आघाडीच्या झेंड्याखाली आंदोलन करावं, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं नाही.

महत्वाच्या बातम्या- 

सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठीच मी नवीन पक्षाची स्थापना करणार आहे- सदाभाऊ खोत

मी माझं जीवन बाळासाहेबांना अर्पण केलं आहे, त्यांचे विचार माझ्या नसानसात आहेत- संजय राऊत

कसं का होईना झालो ना चार वेळा उपमुख्यमंत्री- अजित पवार

सीमाप्रश्न म्हणजे काही कौरव पांडवाचं युद्ध नाही- संजय राऊत

संघ ही राजकीय संघटना नाही आणि राजकारणाशी संघाचा काहीही संबंध नाही- मोहन भागवत