“व्यापाऱ्यांनी भाजपसोबत लग्न केलंय, म्हणूनच…”

यवतमाळ : बँकांची अवस्था, आर्थिक मंदी आणि राजकीय परिस्थिती अशा विविध मुद्द्यांवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यापारी वर्गावरही निशाणा साधला आहे. त्यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारचा समाचार घेतला.

व्यापारी वंचितसोबत येत नाहीत. त्यांनी जीएसटीसोबत लग्नच केलं आहे. पण व्यापाऱ्यांनी भाजपशी काडीमोड घेऊन वंचितसोबत यावं. भाजपचं सरकार पुन्हा आलं तर राष्ट्रीय बँकाही बुडतील, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

वस्तू व सेवा कर प्रणाली म्हणजेच जीएसटीमुळे व्यापारी त्रस्त आहेत, वंचितला सत्ता द्या, त्यामध्ये आम्ही सुधारणा करु, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करता येईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आता विधानसभा निवडणुका येत आहेत. वंचितला सत्ता द्या, जीएसटीमध्ये सुधारणा करु. महिन्याला हा फॉर्म भरा, तो फॉर्म भरा… यापेक्षा आयटीची सुधारित पद्धत आणली जाऊ शकते, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

दरम्यान, राज्यात वंचित बहुजन आघाडीचीच सत्ता येणार, असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला आहे. 

महत्वाच्या बातम्या-