ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटेंचा रूग्णालयातील फोटो समोर!

पुणे | समाजसेवक प्रकाश आंमटेंची प्रकृती सुधारत असल्याचंही त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

प्रकाश आमटेंना कॅन्सर झाल्याचं कळताच अनेकांनी त्यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना केली. दरम्यान 4 दिवसांनी प्रकाश आमटेंचा रुग्णालयातील एक फोटो समोर आला आहे. त्यांचा मुलगा अनिकेत आमटे याने वडिलांच्या फेसबुक अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे.

सध्या पुरता डिस्चार्ज मिळाला आहे. 2-3 दिवसांनी चेक अप होईल. परत रक्ताच्या सर्व टेस्ट करतील आणि ब्लड values ठीक असल्यास लवकरच (8-10 दिवसात) किमो थेरपी सुरू करतील, असं त्यांच्या मुलाने सांगितलं आहे.

डॉक्टर प्रकाश आमटे हे 8 जून रोजी पुणे येथे बीजे मेडिकल कॉलेजमध्ये दीक्षांत समारंभाला आले असता त्यांना जास्त ताप व खोकल्याचा त्रास झाला म्हणून एका खासगी रुग्णालयात उपचार व तपासण्या सुरू आहेत व पूर्ण विश्रांतीचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे, असं अनिकेत आमटे म्हणालेत.

प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे पुत्र आहेत. डिसेंबर 1973 पासून ते पत्‍नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात. लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात.

महत्त्वाच्या बातम्या- 

प्रकाश आमटे यांच्या तब्येतीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती आली समोर 

बिटकॅाईनमध्ये गुंतवणूक केलेले देशोधडीला लागले, झटक्यात पोहोचला इतक्या रुपयांवर 

“राष्ट्रपती निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करतील” 

टेंशन वाढलं! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ, वाचा आजची आकडेवारी 

पंतप्रधान मोदींच्या देहू दौऱ्यामुळे ‘हे’ महत्त्वाचे मार्ग राहणार बंद, वाचा सविस्तर