‘धड खोटंही बोलता येत नाही’; व्हीडिओ पोस्ट करत ‘या’ अभिनेत्याची अमित शहांवर टीका

नवी दिल्ली | गृहमंत्री अमित शहा यांनी कोरोना विषाणूबाबत जनजागृती करण्यासाठी एका वर्च्युअल रॅलीचे आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना अमित शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 51 कोटी लोकांच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये पाठवले, असं म्हटलं. अमित शहांच्या याच वक्तव्यावरून अभिनेता प्रकाश राज यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

इतकं खोटं बोलू नका, असा टोला प्रकाश राज यांनी अमित शहांना लगावला आहे. प्रकाश राज यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. तसेच त्यांनी शहांचा एक व्हीडिओ देखील पोस्ट केला आहे.

किती लज्जास्पद गोष्ट आहे. या मंडळींना आता धड खोटं बोलणंही जमत नाही आहे, अशा आशयाचं ट्विट करुन प्रकाश राज यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, प्रकाश राज यांनी केलेलं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीकडून ‘या’ नेत्याला आमदारकीची खुली ऑफर… पवारांचीच तशी मनोमन इच्छा!

-युवकांनो घराबाहेर पडून मिळेल ते काम स्वीकारा- रोहित पवार

-चीनकडून भारतीय सैन्याचंं कौतुक म्हणाले…’भारत या बाबतीत जगात अव्वल’

-सरकारने चक्रीवादळग्रस्तांना दिलेल्या मदतीचा फेरविचार करावा- नारायण राणे

-अरविंद बनसोड आणि काही दलितांवर अत्याचार झालेत, सरकारने न्याय द्यावा- संभाजीराजे