राष्ट्रवादीकडून ‘या’ नेत्याला आमदारकीची खुली ऑफर… पवारांचीच तशी मनोमन इच्छा!

मुंबई |  राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेच्या काही जागा रिक्त होत आहेत. त्यातल्या एका जागेवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आमदार व्हावं, अशी खुली ऑफर राष्ट्रवादीने शेट्टी यांना दिली आहे.

राजू शेट्टी यांनी आमदार व्हावं, अशी शरद पवार यांची मनापासून इच्छा आहे. शरद पवार यांचा निरोप घेऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी गेले होते. शेट्टी यांच्या निवासस्थानी पाटील यांनी त्यांची भेट घेतली.

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त एकूण 12 जागा भरायच्या आहेत. त्यातील किमान चार जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकतात. शेट्टी यांच्यासारखा संघर्ष करणारा नेता विधानपरिषदेत जावा अशी स्वत: शरद पवार यांचीच भूमिका असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, शरद पवार यांनी दिलेली ऑफर राजू शेट्टी स्विकारणार की अन्य कुणाचं नाव सुचवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजू शेट्टी यांनी जर ऑफर नाकारली तर रविकांत तुपकर यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-युवकांनो घराबाहेर पडून मिळेल ते काम स्वीकारा- रोहित पवार

-चीनकडून भारतीय सैन्याचंं कौतुक म्हणाले…’भारत या बाबतीत जगात अव्वल’

-सरकारने चक्रीवादळग्रस्तांना दिलेल्या मदतीचा फेरविचार करावा- नारायण राणे

-अरविंद बनसोड आणि काही दलितांवर अत्याचार झालेत, सरकारने न्याय द्यावा- संभाजीराजे

-ICICI व्हेंच्युअरतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटींची मदत, उद्धव ठाकरेंनी मानले आभार