“महाराष्ट्रातील अजान बंद झाले पाहिजेत आणि ते आम्ही बंद करणारच”

मुंबई |  हिंदू नववर्षाच्या पुर्वसंध्येला राज्यात जोरदार राजकारण पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपनं सणांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.

ठाकरे सरकार गुढीपाडवा आणि राम नवमीच्या मिरवणुकांना परवानगी कधी देणार आहे, असा सवाल भाजपनं उपस्थित केला आहे. त्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अजान बंदीचा मुद्दा उचलला आहे.

राज्यात अनेकदा अजानबंदी, भोंगाबंदी यावरून जोरदार वाद झाला आहे. पण आता शिवसेना सत्तेत असताना भाजपनं अजानसाठी वापरण्यात येणाऱ्या भोंग्याचा विषय काढला आहे.

मुंबईसहीत महाराष्ट्रभरात स्पिकरवरून होणारी अजान बंदी झाली पाहिजेत, अशी मागणी प्रसाद लाड यांनी सरकारकडे केली आहे. परिणामी आता पुन्हा अजानचा मुद्दा चर्चेत आला आहे.

जुन्या काळात वेळ कळण्यासाठी अजानचा वापर केला जायचा. आता सगळ्यांकडं मोबाईल्स आले आहेत, परिणामी अजानची गरज नाही, असंही लाड म्हणाले आहेत.

राज्यात अजानबंदी करण्याची भूमिका ही आमच्या पक्षाची आहे. परिणामी आम्ही हे अजान बंद करून राहाणारच, असा इशारा लाड यांनी सरकारला दिला आहे.

दिवसातून पाचवेळा अजानचा भोंगा वाजतो. या गोष्टीला भाजप नेतृत्वाचा विरोध आहे. पण आम्ही कोणत्या धर्माला विरोध करत नाहीत, असंही लाड म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यात सरकारनं हिंदू सणांना विरोध करण्याचा सपाटा लावला आहे. मग अजानला विरोध काही नाही, असा सवाल लाड यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Nawab Malik: मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता, कारण…

 “आमच्याकडं मसाला तयारे, आम्ही थेट दणका देणार”

 आमदारांच्या घरांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“ईडीचा वापर पाळलेल्या गुंडासारखा जर कोणी करत असेल तर…” 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय!