अमरावती | अमरावती जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी मोठा राजकीय गोंधळ उडाला होता. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी सरकारवर गंभीर आरोप केले होते.
नवनीत राणा यांनी अमरावती आणि मुंबईच्या पोलीस अधिकाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव आणला होता. तो संसदेनं मंजूर केला आहे. त्यानंतर आता रवी राणा यांनी ठाकरे सरकार आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
खासदार नवनीत राणा यांनी आपल्यावर महाराष्ट्रात पोलिसांनी अन्याय केल्याची आणि आपल्यासोबत गैरव्यवहार केल्याची टीका संसदेत केली होती. त्यावरून आता वाद पेटल्याची शक्यता आहे.
अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी मुख्यमंत्र्यांकडून सुपारी घेतली होती. आम्हाला वेगवेगळ्या कारणांनी त्रास देण्यात आला, असा आरोप रवी राणा यांनी केला आहे.
अमरावतीमध्ये आरती सिंह यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. पैसे घेऊन गुन्हेगारांशी सेटलमेंट केल्या. या आधी त्यांनी काम केलंय त्या ठिकाणीही असाच भ्रष्टाचार केलाय, असा आरोप रवी राणा यांनी केला आहे.
भ्रष्टाचार विरोधात मी पंतप्रधान, गृहमंत्री सर्वोच्च न्यायालय त्याचबरोबर ईडी किंवा सीबीआयकडे जाईन पण आरती सिंह यांना तुरुंगात टाकणारच, असं रवी राणा आक्रमक भूमिका घेत म्हणाले आहेत.
दरम्यान, रवी राणा आणि नवनीत राणा यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्याविरूद्ध दंड थोपटल्याने आता मोठा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“महाराष्ट्रातील अजान बंद झाले पाहिजेत आणि ते आम्ही बंद करणारच”
Nawab Malik: मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता, कारण…
“आमच्याकडं मसाला तयारे, आम्ही थेट दणका देणार”
आमदारांच्या घरांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“ईडीचा वापर पाळलेल्या गुंडासारखा जर कोणी करत असेल तर…”