मोठी बातमी! प्रशांत किशोर यांनी धुडकावली काँग्रेसची ऑफर, ट्विट करत म्हणाले…

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेस पक्षात चर्चा करणार असल्याची चर्चा होती. प्रशांत किशोर यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा रोड मॅप देखील सादर केला होता.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अॅक्शन ग्रुप 2024 स्थापना केली होती. या समितीमध्ये काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, केसी वेणूगोपाल, रणदीप सुरजेवाला, पी चिदंबरम, अंबिका सोनी, जयराम रमेश आणि मुकूल वासनिक आहेत.

काँग्रेस नेत्यांनी 2024 अॅक्शन ग्रुप सामील होण्याचं आवाहन प्रशांत किशोर यांना केलं होतं. मात्र, प्रशांत किशोर यांनी काँग्रेसची ही ऑफर नाकारली आहे.

प्रशांत किशोर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. काँग्रेसच्या निवडणूक सांभाळणाऱ्या ग्रुपमध्ये सामील होण्याची ऑफर मी नाकारली आहे.

काँग्रेस पक्षात मोठे बदल घडवण्यासाठी आणि संरचनात्मक समस्या दूर करण्यासाठी सामूहिक इच्छाशक्तीची आवश्यकता असल्याचं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेसला सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

2024 अॅक्शन कमिटीने प्रशांत किशोर यांनी केलेल्या बहुतांश सुचना उपयुक्त असल्याचं म्हटलं आहे. सदर अहवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींकडे सुपुर्द करण्यात आला असूून अंतिम निर्णय होणार आहे.

प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी यांच्या अनेक भेटी घेत काँग्रेसमधील बदलासंदर्भात सल्ले दिले होते. काही जबाबदारी स्वीकारण्यासाठी काँग्रेसकडून निमंत्रण प्रशांत किशोर यांना देण्यात आलं होतं.

दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षात सामील होण्यासाठी नकार दिला आहे. पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव त्यांनी नाकारल्याचं रणदिप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

पाहा ट्विट-  


रणदिप सुरजेवाला- 

महत्त्वाच्या बातम्या- 

“अजित पवारांना आज काही झोप लागणार नाही”, शरद पवारांच्या वक्तव्यानं एकच हशा पिकला

अनिल देशमुखांना दिलासा मिळणार?, चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर

‘साहेबांसमोर सांगतोय, मला विक्रम काळेंची भीती वाटते’; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी

नवनीत राणांच्या आरोपावर मुंबई पोलिसांचं प्रत्युत्तर; CCTV व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

चोरट्यांचा नाद खुळा! थेट बुलडोझरने फोडलं ATMचं मशीन; पाहा व्हिडीओ