मुंबई | कधी कोणाचं नशीब उजळेल काही सांगता येत नाही. अपयशाने खचून जायचं नसतं. अनेकांनी कर्तृत्वाने आपलं नाव कमवतात. त्यामुळे आयुष्यात संयम असावा, असं लोक म्हणतात.
अशातच प्रसिद्ध डायरेक्टर नागराज मंजुळे यांच्या फेसबूक पोस्टमुळे सध्या एकच चर्चा सुरू आहे. नागराज मंजुळे यांनी त्याचं 10 वी चं मार्कशीट शेअर केली आहे. त्यात त्यांनी फक्त 38 टक्के मिळाल्याचं दिसतंय.
मी दहावीत दोनदा नापास झालो होतो. पहिल्या प्रयत्नात पास झालो असतो फार तर पुढच्या वर्गात गेलो असतो, असं नागराज म्हणाले. मात्र नापास झालो म्हणून फार काही बिघडलं होतं असं मला वाटत नाही, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
दहावी, बारावी, MPSC , UPSC परीक्षा कुठलीही असो, ती अंतिम कधीच नसते, असं नागराज मंजुळे म्हणाले आहेत. यशापयशात असल्या-नसल्यात आनंदानं जगत राहण्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं यश नाही, अशी पोस्ट मंजुळे यांनी केली आहे.
दरम्यान, नागराज मंजुळे यांच्या पोस्टला अनेकांनी पसंती दिली आहे. नागराज मंजुळे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांना इंग्रजीमध्ये 100 पैकी फक्त 6 मार्क पडल्याचं पहायला मिळत आहे.
पाहा पोस्ट-
महत्त्वाच्या बातम्या-
अनिल देशमुखांना दिलासा मिळणार?, चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर
‘साहेबांसमोर सांगतोय, मला विक्रम काळेंची भीती वाटते’; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी
नवनीत राणांच्या आरोपावर मुंबई पोलिसांचं प्रत्युत्तर; CCTV व्हिडीओ शेअर करत म्हणाले…
चोरट्यांचा नाद खुळा! थेट बुलडोझरने फोडलं ATMचं मशीन; पाहा व्हिडीओ