“मी दौरा केल्यामुळे मुख्यमंत्री अन् शरद पवारांना दौरा करावा लागला”

मुंबई |  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कोकण दौऱ्यावर भाजपकडून टीका केली जात आहे. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मी निसर्ग वादळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण दौरा केल्यामुळेच मुख्यमंत्री आणि पवारांना दौरा करावा लागला, असा दावा केला आहे.

निसर्ग वादळाने कोकण किनारपट्टीलगतच्या गावांचं, शेतीचं किती नुकसान झालं आहे, हे मी दौरा केल्यानंतर सरकारसमोर आणलं. मी आवाज उठवल्यानंतर सरकारला उशीरा शहाणपण आलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणि पवारांनी दौरा केला, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

निसर्ग चक्रीवादळाने कोकणाचं फार मोठं नुकसान झालं आहे. त्यांना भरीव आर्थिक मदतीची गरज असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय तोकड्या मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कोकणातील लोकांची निराशा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी येत्या काळात आणखी मदतीची घोषणा करावी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

कोकणच्या जनतेने तुम्हाला भरभरून दिले आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ते अगदी विधानसभा- लोकसभेपर्यंत त्यांनी कायम साथ दिली पण त्यांच्या तोंडाला तुम्ही पानं पुसताय. हे असले प्रकार सोडून द्या आणि पिचलेल्या पिडीत शेतकऱ्याला मदतीची ठोस भूमिका घ्या, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला.

महत्वाच्या बातम्या-

-‘हे तर पवारांनी मान्य केलं’; चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

-पुण्यात रस्त्यावर पचकन थुंकला… अशी कारवाई झाली की त्याला चांगलीच अद्दल घडली!

-दिलासादायक! गेल्या 48 तासांत एकाही पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली नाही

-झुंज अपयशी… राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा कोरोनाने घेतला बळी!

-कोरोनामुळे पहिल्यांदाच आमदाराचा बळी; वाढदिवसालाच ‘या’ आमदाराचा मृत्यू!