पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरत असलेल्या वस्तूंच्या किंमती ऐकाल तर थक्क व्हाल!

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकारणासोबतच दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या गोष्टींमुळेसुद्धा नेहमीच चर्चेत असतात. मोदी वापरत असलेल्या रोजच्या जगण्यातील वस्तूंच्या किंमतीमुळे नेहमीच मोदींवर टीका होत असते. मोदी वापरत असणाऱ्या ब्रँड वस्तूंच्या किंमती पण जबरदस्त आहेत.

नरेंद्र मोदी स्पेशली डिझाईन केलेला पेन त्याबरोबरच स्पेशली डिझाईन केलेली घड्याळ, कोट वापरत असतात. मोदी वापरत असणाऱ्या ‘मोंटेब्लँक’ या कंपनीच्या पेनाची किंमत 2 लाख रुपये इतकी आहे. ही एक जर्मन कंपनी आहे.

त्याबरोबरच ‘मोवाडो’ या कंपनीचं एक घड्याळ मोदींच्या विशेष आवडीचं आहे. ज्याची किंमत अडीच लाख रुपये इतकी आहे. ‘Bvlgari’ या कंपनीचा चष्मा मोदीजी वापरतात याचीही किंमत एक लाख रुपयांपर्यंत आहे. वेस्टर्न आऊटफिट घातल्यावर मोदींना त्यावर एक टोपी घालायला आवडते या टोपीची किंमत पंधरा हजार रुपये आहे.

गुजरातमधील बिपीन आणि जितेंद्र चौहान हे कुर्ता डिझाईनर आहेत. मध्यंतरी मोदी यांनी नरेंद्र मोदी नाव लिहिलेला कोट घातला होता. हा कोट या दोघांनीच डिझाईन केला होता. या कोटची किंमत तब्बल दहा लाख इतकी होती. या कोटचा लिलाव करण्यात आला होता त्यावेळी लिलावात या कोटची किंमत 4,31,31,311 रुपये इतकी लावण्यात आली होती. सर्वात महाग विकला जाणारा कोट म्हणून या कोटची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

उदयनराजेंचा शपथविधी वादग्रस्त ठरल्यानंतर आता राज्यपालांचं उपराष्ट्रपतींना पत्र, म्हणाले…

कॅप्टन एका ठिकाणीच बसलेत, अन् मी मात्र फिरतोय- शरद पवार

“रामाच्या हाती आणि मंदिराच्या कळसावर आता तरी झेंडा फडकवू नका”

कोरोनानं त्यांचं आयुष्यच बदललं!; देहव्यापार सोडून सुरु केलं ‘हे’ काम

आता मुख्यमंत्र्यांनाच झाली कोरोनाची लागण; म्हणाले, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घ्या!