अंगात येतं म्हणून मायलेकाला अघोरी बाबाकडं नेलं; त्यानं जे केलं ते धक्कादायक

कल्याण | कल्याण शहरातील खडकपाडा परिसरात अंधश्रद्धेतून माय-लेकाचा बळी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अघोरीबाबाच्या संगण्यावरून मायलेकांच्या अंगातील भूत उतरवण्यासाठी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून जागीच ठार मारण्यात आलं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पंढरीनाथ शिवराम तरे ( वय 50) आणि चंदूबाई शिवराम तरे ( वय 76) या दोन मायलेकांच्या अंगात भूत येत असल्याच्या संशयावरून कुटुंबियांनी त्यांना अघोरी बाबाकडे नेले. मायलेकांच्या अंगातील भूत उतरवण्यासाठी अघोरी बाबाच्या सांगण्यावरून कुटुंबियांनीच त्यांना लाकडी दांडक्याने मारले व त्यात या मायलेकांच्या जागीच मृत्यू झाला.

खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अघोरी बाबासह तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. आरोपींमध्ये मृत पंढरीनाथ तरे यांचा भाऊ विनायक तरे, वहिनी कविता तरे, त्यांचा अल्पवयीन मुलगा आणि अघोरी बाबा सुरेश पाटील यांचा समावेश आहे.

अटाळी येथील गणेश नगरमधील भोईर कंपाऊंड परिसरातील सद्गुरु माऊली कृपा सदन येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलीस याप्रकरणी आणखी तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

उदयनराजेंचा शपथविधी वादग्रस्त ठरल्यानंतर आता राज्यपालांचं उपराष्ट्रपतींना पत्र, म्हणाले…

कॅप्टन एका ठिकाणीच बसलेत, अन् मी मात्र फिरतोय- शरद पवार

“रामाच्या हाती आणि मंदिराच्या कळसावर आता तरी झेंडा फडकवू नका”

कोरोनानं त्यांचं आयुष्यच बदललं!; देहव्यापार सोडून सुरु केलं ‘हे’ काम

आता मुख्यमंत्र्यांनाच झाली कोरोनाची लागण; म्हणाले, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घ्या!