“देशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पंतप्रधान मोदीच जबाबदार”

पुणे | अमेरिका, ब्रिटन या देशानी त्यांच्या बेरोजगार आणि पगारात कपात झालेल्या कर्मचाऱ्याच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. तसेत देशाच्या तिजोरीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बेरोजगारांच्या खात्यात काही रक्कम जमा करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

केंद्र सरकारने लवकर पावले न उचल्यास, देशात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच यासाठी जबाबदार असतील, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

आपल्या देशाचा आर्थिक विकासाचा दर कोरोना विषाणू येण्यापूर्वी कमी होता आणि आता त्यानंतर आणखी खाली गेला आहे. तरी देखील केंद्र सरकार देशाची आर्थिक परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.

देश कित्येक वर्षे मागे गेले आहेत. अशीच परिस्थिती आपल्या देशाची भविष्यात होणार आहे, असे अनेक अर्थ तज्ञ सांगत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, विकासदर पूर्वीसारखाच राहील. त्यामुळे आपण कोणत्या आधारे सांगत आहात, त्या बद्दल आपण जनतेला सांगावं, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

-नाभिक आणि धोबी व्यावसायिकांसाठी नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे विशेष मागणी

-‘धड खोटंही बोलता येत नाही’; व्हीडिओ पोस्ट करत ‘या’ अभिनेत्याची अमित शहांवर टीका

-राष्ट्रवादीकडून ‘या’ नेत्याला आमदारकीची खुली ऑफर… पवारांचीच तशी मनोमन इच्छा!

-युवकांनो घराबाहेर पडून मिळेल ते काम स्वीकारा- रोहित पवार

-चीनकडून भारतीय सैन्याचंं कौतुक म्हणाले…’भारत या बाबतीत जगात अव्वल’