‘अधिवेशनात चांगल्या हेतूने चर्चा करा’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

मुंबई | आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. उद्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी मीडियाशी संबोधित करताना सर्व खासदारांना महत्वाचं आवाहन केलं आहे.

निवडणुकांमुळे संसदेच्या अधिवेशनावर परिणाम होत असतो. चर्चांवर त्याचा परिणाम होत असतो. हे खरं आहे. पण निवडणूक येतात आणि जातात. अर्थसंकल्प (Budget 2022) हा आपल्या वर्षभराचा लेखाजोखा असतो. त्यामुळे सर्व खासदारांनी संसदेत चर्चेत सहभागी व्हावे. चांगल्या हेतूने आणि चांगल्या मनाने चर्चा करा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलंय.

हे बजेट सत्र जगात फक्त भारताची आर्थिक प्रगती, भारतातील (india) लसीकरण मोहीम, भारताने स्वत: तयार केलेली लस आदींबाबत संपूर्ण जगात विश्वास निर्माण करत आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

मी सर्वांचं देशातील सर्व खासदारांचं या बजेट सत्रात स्वागत करतो. आजच्या वैश्विक परिस्थितीत भारतासाठी अनेक संधी आहेत. हे बजेट सत्र जगात फक्त भारताची आर्थिक प्रगती, भारतातील लसीकरण मोहीम, भारताने स्वत: तयार केलेली लस आदींबाबत संपूर्ण जगात विश्वास निर्माण करत आहे. या सत्रात खासदारांनी मांडलेलं त्यांचं म्हणणं, त्यांच्या चर्चाचे मुद्दे, मोकळ्या मनाने करण्यात आलेली चर्चा आदी गोष्टी वैश्विक प्रभावाची संधी होऊ शकते, असं मोदी म्हणाले.

1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2022-23 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.हे मोदी सरकार यांच्या दुसऱ्या कार्यकालामधील चौथे सर्वसाधारण अर्थसंकल्प असेल. कोरोनाच्या या महामारी काळ दरम्यात येणारे हे अर्थसंकल्प विशेष ठरणार आहे.

सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाला संबंधित अनेकांच्या अनेक मागण्या आहेत तसेच प्रत्येक सेक्टर मधून वेगवेगळ्या अपेक्षा सुद्धा वर्तवण्यात आल्या होत्या.फिनटेक कंपनी ते स्टार्टअप्स आणि बँकिंग ते इन्शुरन्स सेक्टर सगळेजण येणाऱ्या अर्थसंकल्पाकडे नजरा लावून बसलेले आहेत.

प्रत्येकाला येणाऱ्या अर्थ संकल्पातून काहीतरी सवलत हवी आहे.केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 आधी उद्योग संगठन CII ने रविवारी अर्थमंत्री यांच्याकडून काही मागण्या केलेले आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

“महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, पुढचे 25 -30 वर्ष तरी…” 

देशात नवीन राष्ट्रपिता तयार होतोय, त्याचं नाव नथुराम गोडसे- तुषार गांधी 

भारतासाठी गुड न्यूज; कोरोनाबाबत ही महत्वाची माहिती समोर 

‘भिकार सीरियल पाहणं बंद करा’; विक्रम गोखले भडकले 

राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज