नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ मधून देशाला संबोधित करतील. ‘मन की बात’ कार्यक्रमाचा हा 84 वा भाग असेल. 2021 या वर्षातील ही शेवटची मन की बात असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मन की बात नागरिकांना प्रसार भारतीचे रेडिओ चॅनेल, दूरदर्शन आणि नरेंद्र मोदींच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर पाहता येईल. नरेंद्र मोदी यांची मन की बात दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित केली जाते. आजा नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या मन की बातमध्ये उत्तर प्रदेशमध्ये काशी विश्वनाथ धाम येथील विकासकामांचं लोकार्पण या विषयी संवाद साधतील, अशी शक्यता आहे.
केंद्र सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकरी दिल्लीच्या सीमांवरून त्यांच्या घरी परतले हा विषय देखील मन की बातमध्ये समाविष्ट असू शकतो. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिम्मित नरेंद्र मोदी त्यांच्या आठवणी जाग्या करु शकतात.
याशिवाय नरेंद्र मोदी कोरोना लसीकरण, कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्रानं केलेले प्रयत्न आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देखील ते संवाद साधण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाची सुरुवात 3 ऑक्टोबर 2014 रोजी प्रसारित झाली होती. नरेंद्र मोदी मन की बातमध्ये विषय मांडण्यासाठी सूचना मागवून घेतात.
आतापर्यंत मन की बातचे 83 भाग प्रसारित झाले आहेत. नरेंद्र मोदी यांची आज प्रसारित होणारी मन की बात या वर्षातील शेवटची असेल. मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांशी अनेक मुद्द्यांवर बोलतात.
महत्वाच्या बातम्या-
एलआयसीची भन्नाट योजना; 1 रुपयाच्या गुंतवणुकीतून मिळवा कोट्यवधीचा फायदा
‘…तर परिस्थिती चिंताजनक होईल’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केली ‘ही’ भीती
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, म्हणाले…
“राज्यपालांचं उत्तर नाही आलं तरी अध्यक्षपदाची निवडणूक होणार”
“अजित पवार यांनी दरडावून नाही तर समजावून सांगावं”