पृथ्वीबाबांचा मोदी अन् ठाकरे सरकारला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला…

पुणे | देशाची तसंच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोरोनाच्या कचाट्यात सापडली आहे. तिला पूर्वपदावर यायला आणखी वेळ लागणार आहे. आगामी काळात आपली अर्थव्यवस्था रुळावर आणायची असेल तर जून महिन्यात केंद्र व राज्य सरकारने खर्चाचे मिनी अंदाजपत्रक जाहीर करावे, असा महत्त्वपूर्ण सल्ला माजी मुख्यमंत्री तसंच ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

अर्थव्यवस्था रुळावर यावी, यासाठी केंद्राने 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यातून थेट मदत दोन लाख कोटींची होणार आहे. उर्वरित रकमेचे कर्जवाटप व सगळे संभ्रम निर्माण करणारे आहे, अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

देशभरात प्रवासी मजुरांचे स्थलांतर, प्रवासासाठी झालेल्या अडचणी आणि त्यावर झालेलं राजकारण सर्वांना माहित आहे. त्यापुढे जाऊन आधी देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. आपल्याला पुढचा काही काळ कोरोनासोबत जगावे लागेल याची मानसिक तयारी ठेवली पाहिजे, असं ते म्हणाले.

केंद्राने 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यातून आत्ता काय मिळणार हे अजिबात स्पष्ट नाही. उद्योजकांवर मोठा दबाव असल्याने ते खुलून बोलत नाहीत, असं ते म्हणाले.तर प्राप्त माहितीनुसार यातून फक्त 2 लाख कोटींचा थेट फायदा नागरिकांना दिसून येईल. उर्वरित बँक कर्ज, पुरवठा अशा योजना आहेत. त्यातून थेट फायदा दिसून येत नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यातील 150 उद्याने पुन्हा खुली होणार पण…

-बॉलीवूडचा दिग्गज गायक कोरोनाने हिरावला, संपूर्ण बॉलीवूड शोकसागरात

-…म्हणून गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजांचा परळी दौरा रद्द

-क्रिकेटपटू शमीच्या पत्नीनं शेअर केला न्यूडफोटो, सोबत असलेल्या व्यक्तीवरुन तर्कवितर्क

-परप्रांतीय कामगारांना परत आणण्याची जबाबदारी उद्योजकांनी घ्यावी- नितीन गडकरी