“अर्थव्यवस्थेला पुन्हा रूळावर आणायचं असेल तर, आपल्याला काही धाडसी पावलं उचलावी लागतील”

मुंबई | कोरोनाने जगाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड मोठा परिणाम झाला आहे. कोरोना रोगावर आपण नियंत्रण मिळवू पण नंतर आपल्याला मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यायचं आहे, अशी आठवण करून देत अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी भारत सरकारने जीडीपीच्या 100 टक्के कर्ज काढावं, असं मत ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलं आहे.

इथून पाठीमागे आपण देशाच्या जीडीपीच्या 70 टक्के इकतं कर्ज काढत आलो आहोत. मात्र सध्याची परिस्थिती पाहता अर्थव्यवस्थेला जर पुन्हा रूळावर आणायचं असेल तर आपल्याला काही धाडसी पावलं टाकणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.

अमेरिका जीडीपीच्या 100 टक्के कर्ज काढते तर जपान 160 टक्के काढतो. भारतानेही आताच्या बिकट परिस्थितीतून सावरण्यासाठी 100 टक्के इतकं कर्ज काढलं पाहिजे, असं ते म्हणाले. सध्या आपला जीव वाचावायचा की अर्थव्यवस्थेला टिकवून ठेवायचं ही आव्हान आपल्यापुढे आहेत. मात्र जीव तर निश्चित वाचवायचा पण अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचं कामही सरकारकडून झालं पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, सरकारने कोरोना महामारीच्या काळात 1 लाख 70 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. ते पॅकेज अतिशय तुटपुंज्या स्वरूपाचं आहे.  सरकारने 20 लाख कोटीपर्यंत पैसे ओतण्याची तयारी ठेवावी, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

-“पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रमुखावर कारवाई करा”

-चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे रूग्ण; तिघांचा गेला बळी

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार होण्यास आमचा विरोध नाही पण…

-“अन्नदात्यांच्या मुलांना आपल्या मुलांप्रमाणे समजा त्यांच्याकडून रूम भाडं घेऊ नका”

-लॉकडाउनदरम्यान प्रेमी युगुल घरातून पळालं पण….