निवडणुकीआधी म्हणता ओला-उबरमुळे रोजगार वाढले आणि आता म्हणता….- प्रियांका गांधी

नवी दिल्ली | निवडणुकीआधी म्हणता ओला उबरमुळे रोजगार वाढले आणि आता म्हणता ओला-उबरमुळे ऑटो मोबाईल क्षेत्रात मंदी आली, असं ट्वीट करत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजप सरकार अर्थव्यवस्थेच्या संदर्भात द्विधा मनस्थितीत आहे असं म्हटलं आहे. 

भाजप सरकार अर्थव्यवस्थेच्याबाबतीत संभ्रमित आहे. आपण केलेल्या वक्तव्यावर ठाम नाही. आपण केलेल्या वक्तव्यावरून माघार घेतली, असं प्रियांका म्हणाल्या.

लोक आता स्वत:ची गाडी खरेदी करण्यापेक्षा ओला उबरच्या गाडीने प्रवास करणं पसंत करतात. त्यामुळे ऑटो मोबाईल क्षेत्रात मंदी आली आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटलं आहे. त्यावरचं प्रियांका गांधींनी त्यांना प्रश्न विचारला आहे. 

मोदी सरकारने दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर 100 दिवस पूर्ण केल्याच्या निमित्ताने निर्मला सीतारामण यांनी पत्रकार परिषद घेतली होती. गेल्या 21 वर्षांत सगळ्यात कमी चारचाकी गाड्यांची विक्री झाली आहे. अर्थव्यवस्थेत सुस्तीचं मोठं आव्हान देशासमोर आहे, असं त्या यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, भाजपा सरकार अर्थव्यस्थेच्या बाबतीत प्रचंड कन्फ्युज आहे, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचं ट्वीट-

महत्वाच्या बातम्या-