राजेंनी ठरवलं…! मनगटावरचं ‘घड्याळ’ काढायचं अन् ‘कमळाचं उपरणं’ गळ्यात घालायचं

मुंबई |  राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत पंतप्रधान मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ते 14 तारखेला भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांनी स्वत: याबद्दल फेसबुकवरून ही घोषणा केली आहे.

भाजपात प्रवेश केल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 सप्टेंबरला उदयनराजे हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

खासदार उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या पुण्यातील निवास्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची देखील उपस्थिती होती. या बैठकीनंतर उदयनराजे त्यांचा नियोजित भाजपप्रवेशचा निर्णय ते माघारी घेतील, अशी चर्चा होती. परंतू आज त्यांनी राष्ट्रवादीला फार मोठा धक्का दिला आहे.

उदयनराजेंची कोणतीही नाराजी नाही. ते पक्षातच असून बाहेर जाण्याची चर्चा झालेले नाही. ते कधीही भाजपच्या प्रवेशावर बोलले नाहीत, असं धनंजय मुंडेनी काल म्हटलं होतं. मात्र आज उदयनराजेंच्या घोषनेने धनंदय मुंडे तोंडघशी पडले आहेत.

दरम्यान,आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील, असं उदयनराजे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-