प्रियंका आणि दीपिकाही ‘या’ गुन्ह्यात असल्याची शक्यता; मुंबई पोलीस करणार चौकशी

मुंबई | सर्वसामान्य युजर्स ते अगदी चित्रपट सृष्टीमधल्या सेलेब्रिटीपर्यंत सर्वांसाठीच सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या ही महत्वाची असते. कोणत्याही सेलेब्रिटीची स्टार व्हॅल्यू ही त्याच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सवरून ठरवली जाते. दरम्यान, मुंबई क्राईम ब्रँचने फेक सोशल मीडिया फॉलोअर्स स्कॅमची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा जोनस यांचीही नावे आता यामध्ये समोर आली आहेत.

इंस्टाग्रामच्या भाषेत फेक फॉलोअर्सना ‘बॉट्स’ बोललं जातं. या बॉट्सच्या माध्यमातून काही सेलेब्रिटी हे आपले फॉलोअर्स वाढवत असतात, म्हणजेच फॉलोअर्स खरेदी करत असतात. मुंबई क्राईम ब्रँचने याप्रकरणी आत्तापर्यंत अठरा लोकांची चौकशी केल्याचे वृत्त आहे.

मुंबई क्राईम ब्रँचच्या चौकशीदरम्यान, भारतीय आंतराष्ट्रीय ख्यातीच्या अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा जोनस यांच्यासमवेत इतर 10 सेलेब्रिटींची नावं समोर आली आहेत. माहितीनुसार, प्रियांका आणि दीपिकाची येत्या आठवड्यात पोलीस याप्रकरणी चौकशी करू शकतात. त्याबरोबरच, साधारण 150 लोकांचा जबाब ही याबाबतीत नोंदवला जाऊ शकतो.

दरम्यान, याप्रकरणी ज्या अठरा लोकांची चौकशी झाली ते लोक बॉलीवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीशी संबंधित आहेत. यामध्ये कलाकारांबरोबरच निर्माते, दिग्दर्शक, मेकअप आर्टिस्ट, कोरिओग्राफर आणि सहदिग्दर्शकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला खासदारालाही कोरोनाची लागण

इतिहास तुम्हाला कधीही माफ करणार नाही; गेहलोत यांचे मोदींना पत्र

पोटच्या मुलानं नाकारलं अन् सख्ख्या भावानं सोडलं; ‘ती’ स्मशानात एकटीच जळत राहिली!

उपचारासाठी बेड मिळावं म्हणून आठ तास आंदोलन करणाऱ्या युवकाचा अखेर मृत्यू

खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सभापती भडकले; ‘या’ कृत्यामुळे दिली समज!