दहा दिवसांचं लॉकडाऊन संपलं, पुणेकरांसाठी पुढील नियम कोणते?

पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 13 जुलैपासून दहा दिवसांचं कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. हे लॉकडाऊन 23 जुलैला मध्यरात्री संपणार आहे. मात्र, लॉकडाऊन संपत असलं तरी गर्दी नियंत्रणासाठी शनिवार- रविवार या दोन दिवशी प्रतिबंध लागू शकतात.

पुण्यात आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवार- रविवारी नागरिकांची खरेदी करण्यासाठी झुंबड होताना दिसते. त्यामुळे शुक्रवारी जरी ठरलेल्या वेळात नियमितपणे व्यवहार सुरू असले तरीही कोरोनाची स्थिती पाहता शनिवार-रविवारी प्रतिबंध लावण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे.

पुणे व्यापारी महासंघाचे शिष्ठमंडळ यासंदर्भात महापालिका आयुक्तांना आज भेटणार आहे. त्यांच्यामध्ये लॉकडाऊननंतर नेमकी काय नियमावली असेल यावर सविस्तर चर्चा होणार आहे. त्यानंतर पालिका आयुक्त याबाबत घोषणा करतील.

दरम्यान, सम विषम पध्दतीने दुकान उघडण्यास पुणे व्यापारी महासंघाने विरोध केला होता. त्याबरोबरच या संघाने वेळ वाढवून देण्याची मागणीही यापूर्वी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला खासदारालाही कोरोनाची लागण

इतिहास तुम्हाला कधीही माफ करणार नाही; गेहलोत यांचे मोदींना पत्र

पोटच्या मुलानं नाकारलं अन् सख्ख्या भावानं सोडलं; ‘ती’ स्मशानात एकटीच जळत राहिली!

उपचारासाठी बेड मिळावं म्हणून आठ तास आंदोलन करणाऱ्या युवकाचा अखेर मृत्यू

खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सभापती भडकले; ‘या’ कृत्यामुळे दिली समज!