UP Election! मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावरुन प्रियंका गांधींचा मोठा यु-टर्न, म्हणाल्या…

लखनऊ | देशातील पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीला आता सुरूवात झाली आहे. परिणामी प्रत्येक पक्ष आपापली तयारी करण्यात गुंतला आहे. अशात विविध घोषणा आणि दावे केले जात आहेत.

गोवा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, या पाच राज्यातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानंतर आता पक्ष आपापली उमेदवारांची यादी प्रसिद्ध करत आहेत.

पाचपैकी चार राज्यांमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे तर पंजाब या एकमेव राज्यात सध्या काॅंग्रेसची सत्ता आहे. परिणामी भाजपच्या निर्वीवाद सत्तेला हादरा देण्यासाठी विरोधकांनी तयारी चालू केली आहे.

देशाच्या केंद्रीय सत्तेचा रस्ता हा उत्तर प्रदेशातून जातो असं राजकीय जाणकार सांगतात. परिणामी उत्तर प्रदेशात सत्ता मिळवण्यासाठी सर्व पक्ष तयारी करत आहेत.

सध्या उत्तर प्रदेशात भाजपचे योगी आदित्यनाथ सत्तेत आहेत. पण काॅंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशात जोरदार ताकत लावली आहे.

प्रियंका गांधी यांच्या चेहऱ्यावर काॅंग्रेस निवडणुकीला सामोरं जात आहे. पत्रकाराशी बोलताना मी काॅंग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असल्याचं प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या. त्यानंतर देशाच्या राजकारणात त्यांच्या नावाचीच चर्चा होती.

पण प्रियंका गांधी यांनी आपण ते वक्तव्य सततच्या प्रश्नांना कंटाळून केलं आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असले हा निर्णय पक्ष घेणार आहे. फक्त मीच चेहरा आहे असं नाही, अशाप्रकारे प्रियंका गांधी यांनी यु-टर्न घेतला आहे.

मी थोडं चिडून ते वक्तव्य केलं होत कारण तुम्ही परत परत तोच प्रश्न करत आहात, असं स्पष्टीकरण प्रियंका गांधीनी दिलं आहे. प्रसारमाध्यम देखील फक्त मलाच हा प्रश्न का विचारत आहेत, असं प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशची विधानसभा सदस्य संख्या ही 403 आहे परिणामी बहुमताचा आकडा हा 202 आहे. असं असताना काॅंग्रेसचे गेल्या निवडणुकीत 7 आमदार निवडून आले होते हे विशेष आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “राज्यातील सरकार बरखास्त करण्यापेक्षा केंद्र सरकार बरखास्त करा”

“बाळासाहेब असते तर विरोधकांची कावकाव, चिवचिव, फडफड, तडफड थंड पडली असती” 

”आम्हाला बाळासाहेब भेटल्यासारखे वाटेल, आमचा भाऊ आम्हाला भेटणार” 

पोलिसांसाठी महत्वाची बातमी; इतकी मोठी पगारकपात होणार 

Omicron च्या BA.2 स्ट्रेनमुळे शास्त्रज्ञ चिंतेत; दिला ‘हा’ गंभीर इशारा