अभिनेत्री समंथानं डिलीट केली घटस्फोटाची पोस्ट, पुन्हा चर्चांना उधाण

मुंबई | सध्या मनोरंजन विश्वात एकीकडे अनेकांचे लग्न होत असलेले पहायला मिळत आहेत. तोच दुसरीकडे अनेक बडे कलाकार या बंधनातून मुक्त होताना दिसत आहे.

नुकतंच अभिनेत्री समंथा आणि अभिनेता नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाला आहे. त्यांच्या या निर्णयानं अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

तेलगू इंडस्ट्रीतील पाॅवर कपल म्हणून नागा चैतन्य आणि समंथाची ओळख होती. मात्र अनेक दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली होती. ही चर्चा रंगली असतानाच दोघांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर त्यांचे मार्ग आता वेगळे होणार असल्याचं जाहीर केलं.

आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर नागा चैतन्य आणि समंथाची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री समंथानं घटस्फोटाची शेअर केलेली पोस्ट डिलीट केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या नात्याविषयी चर्चा होत आहे.

समंथानं तिच्या इन्स्टाग्रामवरुन घटस्फोटाची पोस्ट डिलीट केली आहे. मात्र नागा चैतन्यनने पोस्ट डिलीट केलेली नाही. त्यामुळे समंथानं डिलीट केलेल्या पोस्टमुळे चर्चा सुरु आहे.

नागा चैतन्य आणि समंथा परत तर एकत्र येणार नाही ना?, असा प्रश्न दोघांच्या चाहत्यांना पडला आहे. त्यामुळे त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

पोस्ट डिलीट करण्यावरुन अद्याप दोघांपैकी कुणीही काहीही बोललेलं नाही. त्यामुळे नक्की काय विषय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, समंथाने 2017 साली साऊथ इंडियन अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबत लग्न गाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या काही काळानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले. समंथा आणि नागा चैतन्य यांच्यामध्ये आलेल्या दुरावाची कल्पना तशी सगळ्यांनाच होती.

समंथाने तिच्या इन्स्टाग्रामवरील नागा चैतन्यचं ‘अक्किनेनी’ आडनाव आपल्या नावासमोरुन हटवल्यापासून त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या आणि अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “राज्यातील सरकार बरखास्त करण्यापेक्षा केंद्र सरकार बरखास्त करा”

“बाळासाहेब असते तर विरोधकांची कावकाव, चिवचिव, फडफड, तडफड थंड पडली असती” 

”आम्हाला बाळासाहेब भेटल्यासारखे वाटेल, आमचा भाऊ आम्हाला भेटणार” 

पोलिसांसाठी महत्वाची बातमी; इतकी मोठी पगारकपात होणार 

Omicron च्या BA.2 स्ट्रेनमुळे शास्त्रज्ञ चिंतेत; दिला ‘हा’ गंभीर इशारा