मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळायला उशीर झाल्याने महिलेचा मंत्रालयातच आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई ।  महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रालयाच्याच इमारतीत एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने ही महिला इमारतीच्या संरक्षण जाळीत अडकून सुखरुप बचावली आहे.

या महिलेचे नाव प्रियंका गुप्ता असून हि महिला आरोग्यसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवण्याकरिता मंत्रालयात येत होती, बऱ्याच दिवस मदत निधी मागूणही  मदत न मिळाल्यामुळे तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असावा, अशी माहिती आहे.

सध्या ही महिला मरीन ड्राईव्ह पोलिसांच्या ताब्यात असून तिची चौकशी सुरु आहे. तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला असावा? हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

यापुर्वीही प्रजासत्ताक भारत या  पक्षाचा कार्यकर्ता  लक्ष्मण चव्हाणने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेत, आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण मंत्रालयाच्या इमारतीला संरक्षण जाळी असल्यामुळे लक्ष्मणचाही जीव वाचवण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या-