मी माफी मागणार नाही; राहुल गांधी भुमिकेवर ठाम

नवी दिल्ली | एका सभेतील भाषणादरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपनं मेक इन इंडियाचं ‘रेप इन इंडिया’ केलं, असं वक्तव्य केलं होतं. यावर राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपनं केली आहे. मात्र, माफी मागण्यास राहुल गांधींनी नकार दिला आहे.

मी कधीही माफी मागणार नाही. महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी माझ्यावर आरोप केले जात आहेत. माझ्या मोबाईलमध्ये एक व्हीडिओ क्लीप आहे, ज्यात पंतप्रधान मोदी दिल्लीला रेप कॅपिटल म्हणत आहेत, असं राहुल गांधींनी सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीला रेप कॅपिटल म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ मी सर्वांसमोर ठेवणार आहे. जेणेकरुण तो सर्वांना पाहता येईल. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, असंही राहुल म्हणाले आहेत.

दरम्यान, राहुल गांधी यांनी देशाचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागावी, असं म्हणत भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभेत गदारोळ घातला.

महत्वाच्या बातम्या-