मुंबई | भारतात लोकशाही रुजली याचं श्रेय काँग्रेसला जातं. सक्षम विरोधी पक्ष नसल्याने नाईलाजाने लोक भाजपला मतदान करत आहेत, असं काँग्रस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
काँग्रेसने भारताची संकल्पना उभी केली आणि ती जगाला पटवून दिली. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीला भारतात पाश्चिमात्य लोकशाही टिकणार नाही अशी भाकितं केली. मात्र भारतात लोकशाही रुजली याचं श्रेय काँग्रेसला जातं, असं ते म्हणाले.
आज युवकांना जोडून घ्यायला काँग्रेस कमी पडली असावी. यासाठी आता चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलं आहे, असं त्यांनी सांगितलं.
अनेकदा काँग्रेसमध्ये अंतर्गत समिती नेमण्यात आल्या. मात्र, त्या समितींच्या अहवालाचं पुढे काय झालं हे समजलं नाही. मध्यंतरी काही निर्णय फार तडकाफडकी घेण्यात आलेत. त्याचा परिणाम बघायला मिळाला, असं ते म्हणाले.
आमचं म्हणणं आहे की काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कोणीही बसावं, पण त्याने ती जबाबदारी घ्यावी. सध्या काँग्रेसमध्ये राहुल गांधींइतका लोकांमध्ये प्रसिद्ध चेहरा दुसरा कोणी नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, प्रशांत किशोर मला मध्यंतरी येऊन भेटले होते. त्यावेळी प्रदीर्घ चर्चा केली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करता करता थांबल्याचं सांगितलं. कारण त्यांच्या काही अटी होत्या आणि त्या पूर्ण होत नव्हत्या, असंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
“तुम्ही काय केलं हिंदुत्वासाठी?, बाबरी पडली तेव्हा तर तुम्ही बिळात लपला होतात”
“लाथ मारायची आणि नंतर सॉरी म्हणायचं अशी त्यांची वृत्ती…”
मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा सेक्स व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ!
भाजपची सर्वात मोठी घोषणा, 26 मे ला देशभर…
मोठी बातमी! किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना नेत्याला अटक