पोलिसांनी वारंवार सांगूनही ऐकलं नाही; ‘या’ कारणामुळे पुणे पोलिसांनी पकडले ६९९ जण

पुणे | पुणे शहर हे कोरोनाचा रेड झोन जाहीर करण्यात आले आहे, त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र घरातून बाहेर पडताना अनेकजण मास्क वापरताना दिसत नाहीत. अशांना पुणे पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.

मास्क न वापरल्यामुळे आतापर्यंत ६९९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आतापर्यंत करण्यात आलेली ही कारवाई आहे.

पोलिसांनी शहरातील मध्य भागात भाग ६ एप्रिलपासून अतिसंक्रमित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. या भागात कर्फ्यू जाहीर केला आहे. पोलिसांनी वारंवार आवाहन करुनही अनेकजण विनाकारण मास्क न घातला घराबाहेर पडत आहे. अशांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

कारवाई केलेल्या काही जणांवर तातडीने दोषारोपपत्र तयार करुन त्यांना न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने त्यांना १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे यापुढे या लोकांना पासपोर्ट, चारित्र्य पडताळणीमध्ये अडचणी येणार आहेत. यापुढील काळात ही कारवाई आणखी कडक करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“लॉकडाऊन संपण्याची चिन्हं नाहीत, हे प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार”

-अभिनेत्री विद्या बालननं कोरोनाच्या लढ्यात केलेली मदत ऐकून तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल!

-3 मे नंतर लॉकडाऊन वाढणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…

-महाराष्ट्र शासन कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पोलीस कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे – गृहमंत्री

-वाधवान बंधूंना ‘ते’ पत्र देण्यासाठी कोणाचाही दबाव नसल्याचं चौकशीत निष्पन्न- अनिल देशमुख