पुणे पोलिसांची आणखी एक मोठी करवाई; आश्विन कुमारच्या घरून भलंमोठं घबाड जप्त

पुणे | सध्या टीईटी परिक्षा घोटाळा प्रकरण राज्यभर गाजत आहे. राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळा प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत.

टीईटी परिक्षा गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलीसांचा कारवाईचा सपाटा सुरूच आहे. पुणे पोलीसांच्या सायबर विभागाने आश्विन कुमारच्या घरून मोठं घबाड जप्त केलं आहे.

आश्विन कुमार हा जी ए टेक्नॉलोजी सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख असल्याची माहिती मिळत आहे. 20 ते 21 डिसेंबरला पुणे पोलीसांनी बेंगळूरूमधून आश्विन कुमारला अटक केली होती.

टीईटी परिक्षा गैरव्यवहार प्रकरणात आश्विन कुमारच्या घरून 24 किलो चांदी, 2 किलो सोनं आणि काही हिरेदेखील जप्त केले आहेत. जप्त केलेल्या या ऐवजाची किंमत 1 कोटीपेक्षा अधिक आहे.

पुणे पोलिसांच्या तपासाचे धागेदोरे उच्च पदावरील अधिकाऱ्यांपर्यत पोहोचत असल्याचं दिसत आहे. पुणे सायबर पोलीसांनी राज्याबाहेर देखील कारवाईचा बडगा उचलला आहे.

पुणे पोलीसांनी टीईटी परिक्षा गैरव्यवहार प्रकरणात उत्तर प्रदेशातून देखील एकाला अटक केली आहे. सौरभ त्रिपाठी नामक व्यक्तीला पुणे पोलीसांनी उत्तर प्रदेशातील लखनौमधून ताब्यात घेतलं.

सौरभ त्रिपाठी हा जी ए टेक्नॉलोजी कंपनीशी संबंधित आहे. तर त्रिपाठी विनर नामक कंपनी चालवत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

दरम्यान, पुणे पोलीसांकडून सध्या तुकाराम सुपेकडून रोकड हस्तगत करण्याचं काम सुरू आहे. 24 तासात सुपेकडून तब्बल 63 लाख रूपये जप्त करण्यात आले आहेत.

तुकाराम सुपेकडून पोलीसांनी 3 कोटी 93 लाख रूपयांचे घबाड जप्त केले आहे. या गैरव्यवहार प्रकरणात सुपेकडून आणखी रक्कम हस्तगत होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती!

Whatsapp लवकरच नवे अपडेट आणण्याच्या तयारीत; ‘हे’ असणार नवे फिचर्स

नितीन गडकरींची मोठी घोषणा, ‘पुढील सहा महिन्यात…’

“…त्यात आमचा कार्यकर्ता असेल तर त्यालाही फासावर लटकवून टाका”

सहावीच्या प्रश्न पत्रिकेत चक्क तैमुरचा प्रश्न; पालक आक्रमक