CAA कायदा काय आहे? अन् त्याचा फायदा नेमका कोणाला होणार? जाणून घ्या सविस्तर

What is Citizenship Amendment Act (CAA) l देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू झाला आहे. मोदी सरकारने काल (12 मार्च) एक अधिसूचना जारी करून ही माहिती दिली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार 2014 पूर्वी भारतात आलेल्या गैर-मुस्लिम अल्पसंख्याकांना नागरिकत्व मिळणार आहे. CAA अंतर्गत ज्या देशांमध्ये गैर-मुस्लिम अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे त्यात बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे. गैर-मुस्लिम अल्पसंख्याकांमध्ये हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मातील लोकांचा समावेश आहे.

What is Citizenship Amendment Act (CAA) l CAA म्हणजे काय? :

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) हा पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या शेजारील देशांतील गैर-मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्वाचा अधिकार देणारा कायदा आहे. हे तेच ते बिगर-मुस्लिम आहेत जे या तिन्ही देशांमध्ये अल्पसंख्याक आहेत आणि धर्माच्या नावाखाली त्यांच्यावर अत्याचार झाले आहेत. अनेक वर्षांपूर्वी ते वैध कागदपत्रे घेऊन भारतात आले होते पण त्यांना नागरिकत्वाचा अधिकार मिळू शकला नाही.

कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? :

भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी बिगर मुस्लिम अल्पसंख्याकांना प्रथम ते पाकिस्तान, बांगलादेश किंवा अफगाणिस्तानचे नागरिक असल्याचे सिद्ध करावे लागेल. त्यासाठी त्यांना पासपोर्ट, जन्म दाखला, शिक्षण प्रमाणपत्र, परवाना किंवा जमिनीची कागदपत्रे यांसह सर्व शासकीय प्रमाणपत्रे दाखवावी लागणार आहेत.

What is Citizenship Amendment Act (CAA) l CAA कायद्याचे नियम आणि अटी :

– CAA कायद्याच्या नियमांनुसार, भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्यापूर्वी सतत एक वर्ष भारतात राहणे बंधनकारक आहे. याचा अर्थ, अर्जाच्या तारखेपूर्वी किमान 12 महिने देशात राहणे अनिवार्य आहे. त्यानंतरच ते अर्ज करू शकतात.

– 12 महिन्यांपूर्वी ज्यांनी देशात सहा वर्षे घालवली आहेत त्यांनाच भारतीय नागरिकत्व दिले जाईल, असेही या नियमांमध्ये म्हटले आहे. त्यानंतरच ते लोक भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतील.

– याशिवाय भारतीय नागरिकत्व मिळवायचे असल्यास त्या लोकांना हे सांगावे लागेल की, ते त्यांचे सध्याचे नागरिकत्व का सोडत आहेत. तसेच त्यांना भारतात स्थायिक का व्हायचे आहे. तसेच अर्जदारांना घोषणापत्र देखील देणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे भविष्यात तो कोणताही दावा करू शकणार नाही.

– भारतीय नागरिकत्व घेणाऱ्यांना भारताच्या कायद्यांचे प्रामाणिकपणे पालन करावे लागेल, असेही या नियमांमध्ये म्हटले आहे. त्यांना भारतीय राज्यघटनेवर खरी श्रद्धा आणि निष्ठा ठेवण्याची शपथ घ्यावी लागेल.

– भारताचे नागरिकत्व मिळवू इच्छिणाऱ्या लोकांना संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध केलेल्या एका भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. सर्व अर्जदारांकडे वैध कागदपत्रे असावीत, असेही नियमात म्हटले आहे.

News Title : What is Citizenship Amendment Act

महत्त्वाच्या बातम्या-

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल

… तर रोहित शर्मा होऊ शकतो चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार!

होळीला घरी जायचंय? तर अशाप्रकारे रेल्वेचे तिकीट बुक करा

या व्यक्तीने खरेदी केली भारतातील पहिली Aston Martin DB12 कार, किंमत आहे कोटींमध्ये

हे खेळाडू क्रिकेटचं मैदान गाजवून राजकीय मैदान गाजवण्यास सज्ज! पाहा कोणकोणत्या खेळाडूंची राजकारणात एंट्री