“…तरच युद्ध थांबेल”; पुतिन यांनी युक्रेनला स्पष्टच सांगितलं

नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धाचे पडसाद जगभर उमटत आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या सैन्याला युक्रेनवर ताबा मिळवण्याचे आदेश दिल्यापासून रशियन सैन्यानं युक्रेनला प्रचंड उद्ध्वस्त केलं आहे.

रशियानं युद्ध थांबवावं यासाठी जगातील अनेक राष्ट्रांकडून रशियावर निर्बंध लादण्यात येत आहेत. संयुक्त राष्ट्र संघटना, नाटो, अमेरिका, युरोपियन युनियन, ब्रिटन यांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत.

रशियावर अनेक निर्बंध लादल्यानंतरही रशिया युद्ध थांबवायला तयार नाही. युक्रेनच्या सैनिकांनी शस्त्रास्त्र खाली टाकावेत आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात, असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले आहेत.

मागण्या मान्य झाल्यानंतरच आम्ही आमचं सैन्य युक्रेनमधून माघारी बोलावू, असं पुतिन यांनी स्पष्ट केलं आहे. परिणामी आता सर्वांच्या नजरा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांकडं लागल्या आहेत.

पुतिन यांनी तुर्किचे पंतप्रधान तय्यिप एर्दोगन यांच्याशी फोनवरून बातचीत करताना युक्रेनला हा संदेश दिला आहे. अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांकडून युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

रशियावर सध्या विविध आर्थिक निर्बंध लादण्यात येत आहेत. तंत्रज्ञान जगतातील अनेक कंपन्यांनी देखील रशियावर निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. परिणामी रशियाला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन आता 11 दिवस झाले आहेत. रशियाकडून युक्रेनच्या शहरांवर मिसाइल हल्ले करण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत युक्रेनचे सामान्य नागरिक देखील युद्धात उतरले आहेत.

दरम्यान, रशियाला या युद्धाचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतिल असं अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे. नाटो देशांकडूनही रशियावर अनेक प्रकारचे संरक्षण विषयक निर्बंध लादण्याची घोषणा करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“काहींनी सांगितलं मी येणार मी येणार, पण आम्ही काय येऊन देतो का?”

BMC चा नारायण राणेंना दणका! पुन्हा बजावली नोटीस 

  Pune: चप्पल फेकी प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

  पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल फेक, वाचा काय आहे प्रकरण 

  IPL 2022 चं बिगुल वाजलं: कोणाचा सामना कोणाशी होणार?, वाचा एका क्लिकवर