संगमनेर | देशातच नव्हे तर राज्यात काँग्रेसची अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये कुणी रहायला तयार नाही. अशा परिस्थितीत प्रदेशाध्यक्षांवरच काँग्रेस सोडायची वेळ तर येणार नाही ना??, असा खोचक सवाल मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी उपस्थित केला. ते संगमनेरमध्ये बोलत होते.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा एकही आमदार निवडून येणार नाही, अशी परिस्थिती आहे. मग संगमनेरमधून काँग्रेसचा आमदार निवडून देऊन काय फायदा, असा टोला त्यांनी लगावला.
वर्षानुवर्षे त्यांनी केवळ मुठभर लोकांचा विकास करून गोरगरिब आणि वंचितांना विकासापासून दूर ठेवलं. या देशाला कामं करणारी लोकं हवी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ते दिसून आलं आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये ते पुन्हा एकदा दिसून येईल, असं विखे म्हणाले.
दरम्यान, संगमनेरमधून युतीचा आमदार निवडून गेला तर 20 ते 25 वर्षांपासून प्रलंबित राहिलेले प्रश्न झटक्यासरशी सुटतील, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा बच्चन गडकरींना फोन करतात… अन् गडकरी म्हणतात ‘चल नाटक मत कर फोन रख!’ https://t.co/QfFBrVm3ly @nitin_gadkari @SrBachchan
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 8, 2019
वाशिममध्ये राष्ट्रवादीला भगदाड; शेकडोंनी केला भाजपत प्रवेश https://t.co/9EK8K8PTNp @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 8, 2019
कलम 370 वेगळी गोष्ट होती….. कलम 371 ला आम्ही हात लावणार नाही- अमित शहा https://t.co/o8fOEBZDHJ @AmitShah
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 8, 2019