“भुंकणाऱ्यांना भुकू द्या महाराज…. आपण आपलं कीर्तन सोडू नका”

कोल्हापूर | निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्या प्रवचन आणि कीर्तनाच्या शैलीमुळे राज्यभर चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यांनी नुकतंच मुलगा आणि मुलीच्या जन्मासंदर्भात दिलेलं वक्तव्य वादात सापडलं असून त्यांच्यावर जोरदार टीका सुरु आहे. मात्र या सगळ्यांमध्ये त्यांची बाजू घेऊन बोलणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील हे इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.

इंदुरीकर महाराजांनी आपलं समाजप्रबोधनाचं काम सुरू ठेवावं. आम्ही त्यांच्यासोबत आहे. भुंकणाऱ्यांना भुकू द्या. आपण घेतलेला समाजप्रबोधनाचा वसा कदापि सोडू नका, असं रघुनाथ दादा पाटील म्हणाले आहेत.

दुसरीकडे गेल्या चार-पाच दिवसांत मला प्रचंड मनस्ताप झाला आहे. हे जर सगळं प्रकरण थांबलं नाही तर किर्तन सोडून शेती करू, असं महाराज भिंगारच्या कीर्तनात म्हणाले. त्यांच्या वक्तव्यानंतर आता त्यांना सोशल मीडियातून वाढता पाठिंबा मिळत असताना आपण कीर्तन सोडू नका, अशी विनवणी लोक करू लागले आहेत.

लोकांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे महाराजांनी देखील कीर्तन बंद न करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाबरोबर माध्यमांनी केलेल्या टीकेने मला काही सुचत नव्हतं. मात्र लोकांच्या चुका शोधणाऱ्या मीडियामुळे हाती घेतलेल्या समाज प्रबोधनाचा वसा मी कोणत्याही स्थितीत सोडणार नाही, असं म्हणत त्यांनी आपण आपलं कीर्तन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार?; अखेर महाराजांनी आपला निर्णय जाहीर केला

-“निवडणूक हा खेळ वाटला का?; फडणवीस सत्तेच्या हव्यासापोटी आंधळे झाले आहेत”

-व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांची मोदींवर जोरदार टीका

-“…तर शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची माफी मागावी”

-…म्हणून शरद पवार घाबरत आहेत- देवेंद्र फडणवीस