इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार?; अखेर महाराजांनी आपला निर्णय जाहीर केला

परभणी |  गेला संपूर्ण आठवडा चर्चेत राहिला तो ह. भ. प. निवृत्ती महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याने. पुत्रप्राप्तीचा ऑड-इव्हन फॉर्म्युला सांगितल्यानंतर महाराज चांगलेच अडचणीत सापडले. त्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली तर काही जण त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. हे प्रकरण थांबले नाही तर महाराजांनी कीर्तन सोडण्याची भाषा केली. आता यानंतर महाराजांनी आपला फायनल निर्णय जाहीर केला आहे.

सोशल मीडियाबरोबर माध्यमांनी केलेल्या टीकेने मला काही सुचत नव्हतं. मात्र लोकांच्या चुका शोधणाऱ्या मीडियामुळे हाती घेतलेल्या समाज प्रबोधनाचा वसा मी कोणत्याही स्थितीत सोडणार नाही, असं म्हणत त्यांनी आपण आपलं कीर्तन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

NCPNDT या कायद्यांतर्गत इंदुरीकर महाराजांना त्यांच्या वक्तव्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे तर अंनिसच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली आहे. दुसरीकडे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी महाराजांवर जोरदार प्रहार करत महिलांचा आदर करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी काल गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केली आहे.

दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांचा पाठिंबा आणि सर्वसामान्य लोक देखील महाराजांना आपला पाठिंबा दर्शवत आहेत. लोकांचं माझ्यावरचं प्रेम लक्षात घेता मी माझं कार्य सोडणार नसल्याचं महाराज म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-“निवडणूक हा खेळ वाटला का?; फडणवीस सत्तेच्या हव्यासापोटी आंधळे झाले आहेत”

-व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांची मोदींवर जोरदार टीका

-“…तर शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची माफी मागावी”

-…म्हणून शरद पवार घाबरत आहेत- देवेंद्र फडणवीस

-आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या, नरेंद्र दाभोळकरांच्या संस्कारात वाढलोय- सुप्रिया सुळे