“शेतकऱ्यांनो आता वीज बीलं भरुच नका”

सांगली | महावितरण वीज कंपनीने राज्यातील शेतकऱ्यांकडून वीज बीलाच्या नावाखाली 30 हजार कोटी रुपयांची लूट केल्याचं समोर आलं. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी बील भरु नये, वीज कंपनीने लुटलेला पैसा परत करण्याचा तगादा लावावा, असं आवाहन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केलं आहे. ते सांगलीत बोलत होते.

शेतकऱ्यांना वर्षाला तब्बल 33 हजार 856 दशलक्ष युनिट राज्यातील शेतकऱ्यांना पुरवल्याचं महावितरण सांगत आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी 22 हजार 856 दशलक्ष युनिट वीज वापरल्याचं वीज नियामक आयोगाच्या अहवालात स्पष्ट झालं आहे. याच पार्श्वभूमीवर रघुनाथ पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे.

महावितरणाने वीज वापराच्या आकड्यांमध्ये मोठा घोळ घातला आहे. गेल्या 5 वर्षात 30 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती वीज नियामक आयोगाने काढलेल्या अहवालातून समोर आली. शेतकऱ्यांनी बील भरु नये, असं आवाहन 1998 साली सांगलीतील मिरजमध्ये पार पडलेल्या अधिवेशनात शरद शिंदेंनी केलं होतं. शेतकरी संघटना याबाबत नेहमी लढत राहिल्याचं रघुनाथ पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, काँग्रेस आघाडीच्या काळात तात्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शेतीपंप वीजबील माफ केल्याची घोषणा केली होती. तात्पुरत्या काळासाठी याची अंमलबजावणी केली. काही काळानंतर शेतकरी पुन्हा वीज बील भरायला लागले. वीज बीलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग सुरु असल्याचा आरोप रघुनाथ पाटलांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“कर्जमुक्ती हा तर केवळ प्रथमोपचार; शेतकऱ्यांचं जीवनमान बदलाव यासाठी सरकार प्रयत्नशील!”

-किर्तनकारांबद्दल माझ्या मनात नेहमी सन्मानच पण,…- सुप्रिया सुळे

-तरूणाईला ठाकरे सरकारचा दिलासा; 8 हजार पोलिस तर 7 हजार सिक्युरिटी गार्डच्या होणार भरत्या!

-भाजपच्या अधिवेशनात मानापमान नाट्य; अखेर खडसेंना पहिल्या रांगेत बसण्याची संधी

-निवडणूक संपलीये, झालं गेलं विसरा… दिल्लीचे 2 कोटी नागरिक माझे कुटुंबीय- केजरीवाल