“कर्जमुक्ती हा तर केवळ प्रथमोपचार; शेतकऱ्यांचं जीवनमान बदलाव यासाठी सरकार प्रयत्नशील!”

जळगाव | कर्जमुक्ती हा केवळ प्रथोमपचार आहे. यातून शेतकऱ्यांना कायमचा दिलासा मिळावा आणि शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सुरुवात करत आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

जैन इरिगेशनतर्फे दिला जाणारा अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार दत्तात्रय भानुदासराव चव्हाण आणि त्यांच्या पत्नी चंद्रकला चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते.

शेतकऱ्यांचं जीवनमान बदललं तर देशाचं स्वरूप बदलल्याशिवाय राहणार नाही. लोकांनी दिलेल्या सत्तेचा वापर लोकांसाठी केला जाईल यासाठी आपली साथ आवश्यक असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातील वाघांचा अधिवास आणि व्याघ्र प्रकल्प यावरून शनिवारी दुपारी मुक्ताईनगरला झालेल्या शेतकरी मेळाव्यात उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी एकनाथ खडसे आणि भाजपच्या नेत्यांना टोमणे मारले.

महत्वाच्या बातम्या- 

-किर्तनकारांबद्दल माझ्या मनात नेहमी सन्मानच पण,…- सुप्रिया सुळे

-तरूणाईला ठाकरे सरकारचा दिलासा; 8 हजार पोलिस तर 7 हजार सिक्युरिटी गार्डच्या होणार भरत्या!

-भाजपच्या अधिवेशनात मानापमान नाट्य; अखेर खडसेंना पहिल्या रांगेत बसण्याची संधी

-निवडणूक संपलीये, झालं गेलं विसरा… दिल्लीचे 2 कोटी नागरिक माझे कुटुंबीय- केजरीवाल

-दिल्लीच्या रामलीला मैदानावर केजरीवालांचं काळजाला हात घालणारं भावूक भाषण!