काँग्रेस सरकारने चालू केलेल्या अनेक योजना या संकटाच्या काळात प्रभावी ठरतायेत- अभिजीत बॅनर्जी

नवी दिल्ली | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्यासोबत कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर चर्चा करत आहेत. यावेळी याचर्चेदरम्यान युपीए सरकारने चालू केलेल्या अनेक योजना या संकटाच्या काळात फायद्याच्या ठरतायेत, असं मत अभिजीत बॅनर्जी यांनी मांडलं आहे.

अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी भारताने काय पावलं उचलावीत, यासंबंधी राहुल गांधीअभिजीत बॅनर्जी यांना बोलतं करत आहेत. यावेळी सरकारने लाँगटर्म उपाययोजना करण्याची गरज आहे. तसंच लघु आणि मध्यम उद्योगाला सरकारने मदत केली पाहिजे, असा सल्ला बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

कोरोनाचा पर्याय आज किंवा उद्या संपणार नाही. लवकरात लवकर लॉकडाऊनमधून बाहेर पडणं गरजेचं आहे.तसंच लॉकडाऊनंतर चांगल्या उपाययोजनांची गरज आहे, असंही ते म्हणाले

दरम्यान, संकटातून बाहेर पडण्यास केंद्राने राज्यांना निधी द्यावा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे. दुसरीकडे आधार कार्ड आणि रेशन लिंक करण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाच्या आकडेवारीत मोठा झोल आहे; निलेश राणेंचा आरोग्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

-काश्मिरमधील शहीदांच्या कुटुंबावरही कुणीतरी फुले उधळा- संजय राऊत

-“हिंदू मुस्लिम राजकारण करणाऱ्यांनी कालच्या हल्ल्यातलं इन्स्पेक्टर काझी यांचं बलिदान विसरू नये”

-“मोदी सरकार अपयशी; मात्र जनतेला पटवून देण्यात आम्हाला यश आलं नाही”

-उ. प्रदेश सरकारची तिजोरी मालामाल; एका दिवसात तब्बल एवढ्या कोटींची मद्यविक्री