“भारत सध्या आणीबाणीच्या परिस्थितीशी झुंजतोय, अन तुमचं चाललंय तरी काय?”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या फेसबुक अकाउंटमार्फत थट्टा मस्करी करुन देशाचा वेळ वाया घालवणं बंद करावं असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर केला आहे या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यालयालाही टॅग केलं आहे.

आपल्या सोशल मीडिया अकाउंटबाबत गैरसमज पसरवून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा. भारत सध्या आणीबाणीच्या परिस्थितीशी झुंजतोय. सध्या कोरोना व्हायरस देशासाठी एक आव्हान बनलं आहे. सरकारने कोरोनाचा सामना कसा करता येईल? याकडे लक्ष द्यायला हवं”, असा सल्ला राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

देशातील जनतेला कोरोना व्हायरसपासून मोठा धोका आहे. कोरोना व्हायरसचा परिणाम हा भारत आणि भारतीय अर्थव्यवस्थेवरही पडू शकतो, असं राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. “काळजी करण्याची आवश्यकता नाही, घाबरु नका. आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून कोरोनाचा सामना करायचं आहे”, असं मोदी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच्या गळ्यात पडणार विधानसभा उपाध्याक्षपदाची माळ?

-दिराने माझा मानसिक आणि लैंगिक छळ केला; सुन डॉ. गौरी चव्हाणांचा गंभीर आरोप

-काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींना अज्ञातांकडून मारहाण

-शेण आणि गोमूत्रामुळे कोरोना रोखता येवू शकतो; भाजप आमदाराचा अजब दावा

-हिंमत असेल तर सांगाच, आम्ही मुस्लिमांना आरक्षण देवू शकत नाही- देवेंद्र फडणवीस