“पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का?, ते नेमकं काय लपवत आहेत?”

नवी दिल्ली |  गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. भारताने देखील चीनला चोख प्रत्युत्तर देताना चीनच्या 43 सैनिकांना मारलं आहे. या सगळ्या संघर्षानंतर देखील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यावर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. यावरच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे.

भारत आणि चीनदरम्यान एवढा मोठा संघर्ष होऊन देखील भारताचे पंतप्रधान नरेंदर मोदी गप्प का बसलेत? ते लपून का बसलेत याचं कारण काय? चीनने आमचे सैनिक मारले, आमची जमीन घेतली…. नेमकं काय झालंय ते समजायला हवं, राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने देखील पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. लहानसहान गोष्टींवर ट्वीट करणारे पंतप्रधान शहीद जवानांबद्दल चकार शब्दही काढायला तयार नाहीत! पंतप्रधानांच्या मौनव्रताने वर्तमान प्रश्न सुटणार नाही, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

पंतप्रधानांच्या मौनव्रताने वर्तमान प्रश्न सुटणार नाही तर त्यासाठी विषयाची जाण, दूरदर्शिता, मुत्सद्देगिरी, नियोजन, राजकीय इच्छाशक्ती आणि योग्य परराष्ट्र धोरणाची गरज आहे, असा टोमणा काँग्रेसने लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भारत आणि चीनच्या सैन्यात का झाला वाद?, घटनास्थळी नेमकं काय काय घडलं???

-भारत-चीन सीमेवरील झटापटीनंतर चीनकडून अधिकृत निवेदन

-मुनगंटीवारांचं शिवसेना प्रेम पुन्हा गेलं ऊतू, म्हणाले शिवसेनेचा त्याग….

-बदला घ्या, सैनिकांचं बलिदान वाया जाता कामा नये- असदुद्दिन ओवैसी

-सरकार गेलं, पदही गेलं…. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची ‘या’ पदावरील नियुक्ती रद्द