Top news देश

कोरोनाच्या बहाण्याने श्रमिकांचं शोषण करु नका- राहुल गांधी

नवी दिल्ली | देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या बहाण्याने श्रमिकांचे शोषण नको, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

काही राज्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रमिकांच्या हितास बाधा आणणारे निर्णय घेतले जात आहेत. कोरोनाच्या बहाण्याने श्रमिकांचे शोषण केले जाऊ नये, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.

अनेक राज्यांकडून कामगार कायद्यात दुरुस्ती केली जात आहे. कोरोनाचे संकट गंभीर आहे व आपण सर्व त्याविरोधात लढत आहोत. मात्र कोरोनाच्या आडून कोणी मानवी हक्कांचे उल्लंघन करू नये, तसेच कामगारांची पिळवणूक करून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नये. कामगारांसंबंधी जी मूलभूत तत्त्वे आहेत त्यात कोणालाही तडजोड करता येणार नाही, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी देखील आर्थिक सुधारणेच्या नावाखाली कामगार, पर्यावरण व जमिनीसंबंधी कायद्यांमध्ये फेरफार करणे अतिशय घातक ठरेल, असं मत मांडलं आहे. दुसरीकडे सरकार जोखीम पत्करण्यास तयार नाही. मात्र ही वेळ जोखीम घेण्याचीच आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेसकडून मला सहाव्या जागेची ऑफर होती, भाजप आमदारही क्रॉस वोटिंग करणार होते- एकनाथ खडसे

-“चुकीची माहिती दिली म्हणून मंत्री अनिल परब यांना अटक होणार का?”

-केंद्राने महाराष्ट्राचा GST परतावा द्यावा; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मागणी

-सॅमसंगने ‘ती’ ऑफर 17 मेपर्यंत वाढवली; एसी, फ्रिज-टीव्हीवर मिळणार कॅशबॅक

-अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा सुरु करा; उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी