“राहुल गांधींनी शरद पवारांकडून काहीतरी शिकावं”

नवी दिल्ली | अर्थसंकल्पावर चर्चेला उत्तर देताना काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा पंतप्रधानांनी राज्यसभेत बोलताना राहुल गांधींना फैलावर घेतलं आहे.

पंतप्रधान मोदींनी काल भाषणात बोलताना महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप लगावले होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत महाराष्ट्र काँग्रेसने परप्रांतियांना हकलून लावलं, असं मोदींनी म्हटलं होतं.

त्यानंतर आता राज्यसभेत मोदींनी शरद पवारांचा दाखला देत राहुल गांधींचे कान टोचले आहेत. निराशेने भरलेला असा नेता असेल तर पक्षाचे काय होईल?, असं मोदी म्हणाले आहेत.

फक्त संसदेत बसल्यावरच देशाची चिंता केली जाते का?, असा सवाल करत त्यांनी राहुल गांधींवर टीका केलीये. राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना मोदींवर टीका केली होती. त्यावर आता मोदींवर प्रत्युत्तर दिलंय.

कोणाकडून शिकण्याची इच्छा नसेल तर किमान शरद पवारांकडून तरी दोन गोष्टी शिका, असा सल्ला देखील मोदींंनी राहुल गांधी यांना दिलाय.

काँग्रेस नसती तर देशाला आणीबाणीचा कलंक लागला नसता. काँग्रेस नसती तर जातीवाद आणि क्षेत्रवाद फोफावला नसता. काँग्रेस नसती तर देशात शिखांचा नरसंहार झाला नसता, अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली आहे.

दरम्यान, आज भाषणात बोलत असताना नरेंद्र मोदींनी शरद पवार यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. मोदींच्या या वक्तव्यामुळे आता राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील जवळीक वाढतीये का?, असा सवाल आता उपस्थित होतोय.

महत्वाच्या बातम्या- 

“महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही आणि कधी झुकणारही नाही”

“मोदींनी पंतप्रधानपदी बसवणाऱ्या महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान केलाय”

मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावर महाराष्ट्रात संताप; ट्विटरवर #महाराष्ट्रद्रोही_BJP हॅशटॅग होतोय ट्रेंड! 

अभिमानास्पद! शेतकऱ्याच्या लेकराची मोठी झेप; बुलडाण्याचा राजू केंद्रे फोर्ब्सच्या यादीत झळकला 

“जशी लता मंगेशकर यांनी आंबेडकरी गाणी गायली नाहीत तशी…”