पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांचं तोंडभरून कौतुक, म्हणाले “शरदराव त्यावेळी जर…”

नवी दिल्ली | काल लोकसभा गाजवल्यानंतर आता राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेसवर टीकास्त्र चालवलं आहे. कालच्या भाषणावरून वाद पेटला असतानाच पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देताना मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं तोंडभरून कौतुक देखील केलंय.

पंतप्रधान मोदींचं भाषण सुरू असताना त्यांनी एक दोन नव्हे तर तीन वेळी मोदींचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर शरद पवारांचं (शरदराव) नाव घेत राहुल गांधींना सल्ला देखील दिला.

कोरोना जेव्हापासून मानव जातीवर संकट निर्माण करत आहेत तेव्हापासून सरकारने या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न केले. सार्वजनिक जीवनात उतार चढाव येत असतात, असं मोदी म्हणाले.

पुढे मोदी म्हणतात, जय पराजय येत असतात. त्यातून जी व्यक्तिगत निराशा निर्माण होते ती देशावर थोपवू नये. गुजरातमध्ये एक गोष्ट आहे जी शरद पवारांना माहिती असेल, असं म्हणत त्यांनी शरद पवारांचा उल्लेख केला.

फक्त संसदेत बसल्यावरच देशाची चिंता केली जाते का?, असा सवाल करत त्यांनी राहुल गांधींवर टीका केली. तर कोणाकडून शिकण्याची इच्छा नसेल तर किमान शरद पवारांकडून तरी दोन गोष्टी शिका, असा सल्ला देत त्यांनी दुसऱ्यांदा पवारांचा उल्लेख केला.

कोरोना काळात आम्ही बैठका घेत होतो. मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही 23 बैठका घेतल्या, त्यात काही लोकं आली नाहीत. त्यांनी बहिष्कार घातला होता. त्यावेळी शरदराव आले होते. त्यावेळी टीएमसीचे नेते आले होते, असं म्हणत मोदींनी काही मिनिटात शरद पवारांचा तिसऱ्यांदा उल्लेखे केला.

दरम्यान, नरेंद्र मोदी दरवेळी शरद पवार यांचं कौतुक करताना दिसतात. मात्र, आता मोदींनी राज्यसभेत पवारांचं कौतुक केल्यानं राजकारणाला नवं वळण लागणार की काय, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

महत्वाच्या बातम्या- 

“राहुल गांधींनी शरद पवारांकडून काहीतरी शिकावं”

“महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही आणि कधी झुकणारही नाही”

“मोदींनी पंतप्रधानपदी बसवणाऱ्या महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान केलाय”

मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावर महाराष्ट्रात संताप; ट्विटरवर #महाराष्ट्रद्रोही_BJP हॅशटॅग होतोय ट्रेंड! 

अभिमानास्पद! शेतकऱ्याच्या लेकराची मोठी झेप; बुलडाण्याचा राजू केंद्रे फोर्ब्सच्या यादीत झळकला